सव्वाशे वर्षांचा क्रमिक पुस्तकांचा संग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:40+5:302021-08-22T04:16:40+5:30

अशरफ सर मालेगाव शहराच्या नयापुरा गल्ली नं. ११, रहेमानी मशीदसमोर येथे आपल्या कुटुंबासह जुन्या पद्धतीच्या दुमजली घरात राहतात. ...

A collection of five hundred years of serial books | सव्वाशे वर्षांचा क्रमिक पुस्तकांचा संग्रह

सव्वाशे वर्षांचा क्रमिक पुस्तकांचा संग्रह

googlenewsNext

अशरफ सर मालेगाव शहराच्या नयापुरा गल्ली नं. ११, रहेमानी मशीदसमोर येथे आपल्या कुटुंबासह जुन्या पद्धतीच्या दुमजली घरात राहतात. या छोट्याशा जागेत त्यांनी ही पुस्तके जपून ठेवली आहेेत. प्रत्येक पुस्तकाला प्लास्टिक पिशवी लावली आहे. ही सर्व जुनी पुस्तके आता खूपच जीर्ण झाली आहेत. अतिशय परिश्रमपूर्वक गोळा केलेली पुस्तके जतन करण्याची समस्या त्यांना सतावतेय. यासाठी त्यांनी पुणे, मुंबई, दिल्लीपर्यंत शासकीय दारे ठोठावली आहेत. अजूनपर्यंत कोणाचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

सव्वाशे वर्षांपासूनची ही पुस्तके अशरफ सरांनी मिळेल तेथून वा रद्दीतून गोळा केली आहेत. शैक्षणिक संशोधन करणारे आणि सर्वसामान्य शिक्षणप्रेमी लोक व शिक्षकांना त्यांचा लाभ व्हावा, यासाठी आधुनिक पद्धतीने जतन करण्याची नितांत आवश्यकता आहे. जमहूर कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज प्रा. अहमद अय्युबी व शिक्षक मुस्तफा बरकती या दोघांनी त्यांना याकामी सहकार्य केले आहे. अशरफ सरांचे चिरंजीव मोहंमद जुनैद व मोहंमद उसेर यांनी या कामाची वेबसाइट तयार केली आहे. मालेगाव शहरातील सम्राट मंडळ, राष्ट्र सेवा दल, संभाजी ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हम हिंदुस्तानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच अशरफ सरांच्या शैक्षणिक पुस्तकांच्या ग्रंथालयाला भेट दिली.

याशिवाय अशरफी सरांनी भाषा शिकण्याची सोपी पद्धत तयार केली आहे. मराठीत मोडी शिकण्याचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. एमसीईआरटीचा त्यांना विशेष पुरस्कारही मिळाला आहे. ई-लर्निंग कसे करावे यावरही पुस्तके तयार करीत आहेत. ‘मालेगाव स्कूल डायरी’ हे मालेगावातील सरकारी प्राथमिक शाळांबाबत माहिती देणारे पुस्तक अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे.

चाैकट :

१२५ वर्षांपूर्वीची पुस्तके जतन करणे ही फार मोठी बाब असून, मालेगाव शहराला भूषणावह आहे. हा शैक्षणिक ठेवा सांभाळण्याचे व आधुनिक पद्धतीने जतन करण्यासाठी शहरवासीयांसोबत आपण प्रयत्न करू, असे आश्वासन मालेगाव मर्चण्ट बँकेचे संचालक राजेंद्र भोसले व सामाजिक कार्यकर्ते सुभाष परदेशी, रहीम शेख आदींनी यावेळी दिले.

फोटो फाईल नेम : १९ एमएयुजी ०८ . जेपीजी

190821\043719nsk_51_19082021_13.jpg

फोटो

Web Title: A collection of five hundred years of serial books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.