सामूहिक एनसीसी गीत गायनाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 01:15 PM2017-11-26T13:15:24+5:302017-11-26T13:15:59+5:30
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेला १०० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) दिनाचे औचित्य साधत संस्थेतील विद्यार्थी कॅडेट आणि शिक्षकांनी एकत्र येत सामूहिक एनसीसी गीत गाऊन या घटनेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.

रविवारी (दि. २६) एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोखले एज्युकेशनच्या एचपीटी - आरवायके आर्ट्स आणि बीवायके कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी होत या अनोख्या विक्रमाची नोंद केली.
नाशिकच्या नाशिक रोड, ओझर या संस्थासह परळ आणि बोर्डी येथील महाविद्यालयातही एकाच वेळी या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन हा विक्रम करण्यात आला. गोखले एज्युकेशनच्या संपूर्ण संस्थांमधून २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग होता.