रथसप्तमीनिमित्त सामूहिक सूर्यपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:15 PM2020-02-01T23:15:12+5:302020-02-02T00:12:21+5:30
भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकविते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र वेरूळ येथे रथसप्तमीच्या पर्वकालावर सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह भाविकांनी सामूहिक सूर्यपूजन करून सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केले.
सामूहिक सूर्यपूजनप्रसंगी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह भाविक.
ओझर टाउनशिप : भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकविते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र वेरूळ येथे रथसप्तमीच्या पर्वकालावर सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह भाविकांनी सामूहिक सूर्यपूजन करून सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केले.
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र वेरूळ येथील आश्रमात अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह भाविकांनी रथसप्तमीनिमित्त भगवान सूर्यनारायणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामूहिक सूर्यपूजन केले. आश्रमाच्या वतीने उपस्थित भाविकांना माहिती देताना सांगितले की, माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्यनारायण आपल्या रथात बसून प्रवास करतात. या रथाला सात घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांचे इंद्र हे प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.