मालेगावला जिल्हाधिकारी, नाशिकसाठी आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:46 PM2020-05-07T23:46:08+5:302020-05-07T23:46:24+5:30
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त तर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशा सूचना गुरूवारी (दि.७) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगावमधील परिस्थितीवर जिल्हाधिकारी, नाशिक शहरावर महापालिका आयुक्त तर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशा सूचना गुरूवारी (दि.७) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आरोग्य उपसंचालक पठ्ठणकोट शेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, सुरुवातीला आपल्या जिल्ह्यात एकही कोरोना संसर्गित नव्हता, आज तो सर्वदूर पसरला आहे. शहरी भागातील संसर्ग आज तालुकास्तरावर ग्रामीण भागातही जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणा व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपसातील समन्वय बळकट करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब नमुन्यांचे अहवाल तत्काळ लवकरात लवकर मागवून पॉझिटिव्ह रुग्णांवर तत्काळ इलाज कसे करता येतील यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे. मालेगावपाठोपाठ आता जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मालेगावसह येवल्याची रुग्ण संख्या चिंतेचा विषय असून, तेथे एका वरिष्ठ अधिकाºयाची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात यावी. महिला, मुली, लहान बालके त्यांच्यासोबतच आहेत. ते जात असतील तर त्यांना जाऊ द्यावे. ज्यांना निवारागृहांमध्ये राहायचे आहे त्यांना थांबू द्यावे. त्यांच्याशी मानवतेच्या भावनेतून प्रशासन व जनतेने व्यवहार करावेत, असे आवाहनही यावेळी मंत्री भुजबळ यांनी केले.
---------
अधिकारी कामकाजावर लक्ष ठेवून
विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सांगितले की, कालच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात मालेगावसाठी समन्वयाची जबाबदारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक शहरासाठी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व नाशिक ग्रामीणची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी पूर्वीपासूनच दररोज या क्षेत्रातील कामकाजाकडे लक्ष ठेवून आहेत, तसेच प्रत्यक्ष त्या भागांत भेटी देऊन उपाययोजना करत आहेत.