जिल्हाधिकाऱ्यांकडून सिन्नरला मिठाईचे दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:03 AM2021-03-24T01:03:57+5:302021-03-24T01:04:28+5:30
सिन्नर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: शहरातील रस्त्यावर फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. मिठाई दुकानात नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यानंतर सदर दुकान तत्काळ सील करण्यात आले.
सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: शहरातील रस्त्यावर फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. मिठाई दुकानात नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यानंतर सदर दुकान तत्काळ सील करण्यात
आले.
जिल्हाधिकारी मांढरे यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन होते की नाही याबाबत पोलीस व नगर परिषद प्रशासन यांनी संयुक्तपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या. ग्रामीण भागात गटविकास अधिकारी व पोलिसांनी संयुक्तपणे यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. काेरोनाचे एकूण रुग्ण व गृह विलगीकरण असलेल्या रुणांचा त्यांनी आढावा घेतला.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सिन्नर शहरात फिरुन पाहणी केली. शहरातील गंगावेस भागापासून ते सिन्नर बस स्थानकापर्यंत पायी फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली.