सिव्हिलच्या कोविड कक्षाला जिल्हाधिकाऱ्याची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:14 PM2020-09-16T23:14:35+5:302020-09-17T01:26:38+5:30

नाशिक : जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालय व्यवस्थापनाचा व कोविड रुग्णाच्या व्यवस्थापनाशी निगडीत सर्व बाबींची शहानिशा करुन आढावा घेतला.

Collector's visit to Kovid room of Civil | सिव्हिलच्या कोविड कक्षाला जिल्हाधिकाऱ्याची भेट

सिव्हिलच्या कोविड कक्षाला जिल्हाधिकाऱ्याची भेट

Next
ठळक मुद्देआहाराचे दैनंदिन नियोजनाची त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली .

नाशिक : जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालय व्यवस्थापनाचा व कोविड रुग्णाच्या व्यवस्थापनाशी निगडीत सर्व बाबींची शहानिशा करुन आढावा घेतला.
यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयाचे रुग्णांसाठीचे स्वयंपाकगृह, कोविड प्रयोगशाळा, रुग्णालयाची आॅक्सीजन प्रणाली, औषधालय, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा त्यांनी या दरम्यान आढावा घेतला. रुग्णालयातील आहार विभागास प्रत्यक्ष भेट देवुन रुग्णांना दिल्या जाणाºया आहाराचा दर्जा तपासला व दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे संबंधीत कर्मचारी यांचे कामकाज बाबत जाणुन घेतले . कोविड रुग्णांना दिल्या जाणाºया आहाराचे दैनंदिन नियोजनाची त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली . सदर भेटी दरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले रुग्णांच्या नातेवाईक यांचेशी प्रत्यक्ष संवादसाधुन त्यांचे अडचणी जाणुन घेतल्या . जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक प्रणाली, आॅक्सीजन पुरवठा तसेच कोविड आजाराच्या रुग्णांसाठीच्या आर टी पी सी आर प्रयोगशाळेची पाहणी केली तसेच सदर ठिकाणीचे कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयातील विभाग प्रमुख , वैद्यकिय अधिकारी व इतर कर्मचारी यांचेशी देखील संवाद साधुन त्यांना आरोग्य सेवा देताना प्रत्यक्ष येणा - या अडचणी बाबत विचारपुस केली व कामकाजाचा दर्जा देखील तपासला . कोविड रुग्णालयात आवश्यकÞ मनुष्यबळ उपलब्धता व सदर कर्मचारी यांचे कामकाज, रुग्णांसाठी आवश्यक औषधी व साधान सामग्री यांची उपलब्धता, रुग्णालयात होणारा आॅक्सीजन पुरवठा , इतर आवश्यक साहित्य सामग्री , याचा होणारा पुरवठा याबाबत सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना उच्च्तम व दर्जेदार सेवा देवुन मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वोतपरी उपाययोजना अमलात आणण्याच्या मानस त्यांनी बोलुन दाखविला . तसेच व्हिडीओ कॉलींगव्दारे कोविड रुग्णालयातील रुग्णांशीही त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला व रुग्णालयात मिळणा - या सोई - सुविधांविषयी व औषधोपचार विषयी रुग्णांकडुन शहानिशा केली . तसेच आवश्यक औषधोपचार व सुविधा रुग्णांना वेळेत पुरविण्या विषयी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
 

 

Web Title: Collector's visit to Kovid room of Civil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.