गरजवंतांच्या मदतीसाठी सरसावले महाविद्यालयीन विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:47+5:302021-05-31T04:11:47+5:30
नाशिक : ‘एकमेकांस साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तुकारामांच्या सुंदर वचनाला अनुसरून नाशिक शहरातील विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या संकट ...
नाशिक : ‘एकमेकांस साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तुकारामांच्या सुंदर वचनाला अनुसरून नाशिक शहरातील विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या संकट काळात गरजवंतांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवून दाखवून दिले आहे.
संकटात असलेल्या व्यक्तीला आपल्याकडून केलेली किरकोळ मदतही समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते, मातोश्री फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या अन्नदानाच्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. महाविद्यालयातील औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविताना गरजू, गरीब, अनाथ लोकांना तपोवन, पंचवटी, रामकुंड येथे अन्नदान, मास्कचे वितरण करतानाच व्यक्तिगत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परिसरातील गरीब व गरजू लोकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान राबविले, तसेच त्यांना सॅनिटायझेशनचे महत्त्व समजावून सांगितले. लहान मुलांना बिस्कीटच्या पाकिटांचे वाटप केले. त्याचप्रमाणे, लसीकरणाबाबतही जनजागृती करून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. एन.एस.एस. चे विद्यार्थी प्रतीक गुजरानी, विजय बारसाळे, शुभम खैरे, जयेश कदम, पूर्वा धोंडगे या विद्यार्थांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात प्राचार्य डॉ.जी. एस. तळेले, प्रा.पूनम शिंदे, प्रा.प्रशांत व्यवहारे, प्रा.श्रद्धा सांगळे, प्रा.सचिन कापसे आदी शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्राचार्य डॉ. जी.एस. तळेले, प्रा.पूनम शिंदे, प्रा.प्रशांत व्यवहारे, प्रा.श्रद्धा सांगळे, प्रा.सचिन कापसे आदी शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कोट-
कोरोनाचा सामना करताना, भारतातील सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे. मात्र, अशा परिस्थितीतही मदत करणाऱ्यांची कमी नाही. शक्य त्या परीने विदयार्थी मदतीसाठी पुढे येत आहेत. एनएसएसच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविताना, विद्यार्थ्यांनी गरजवंतांच्या मदतीसाठी उचलले पाऊल निश्चितच अभिमानस्पद आहे.
- प्राचार्य जी.एस. तळेले, मातोश्री फार्मसी विद्यालय
===Photopath===
300521\30nsk_8_30052021_13.jpg~300521\30nsk_9_30052021_13.jpg
===Caption===
गरजवंताना जेवनाची पाकिटांचे वाटप करताना विद्यार्थी व शिक्षक ~गरजवंताना जेवनाची पाकिटांचे वाटप करताना विद्यार्थी व शिक्षक