महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 09:38 PM2020-06-22T21:38:13+5:302020-06-22T23:02:05+5:30
सिन्नर : शहरातील देशमुखनगर परिसरातील अश्वीनाथबाबा चौकात वास्तव्यास असलेल्या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरातील बेडरुमध्ये सिलींग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
सिन्नर : शहरातील देशमुखनगर परिसरातील अश्वीनाथबाबा चौकात वास्तव्यास असलेल्या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरातील बेडरुमध्ये सिलींग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
शुभम सुनील वहाणे (१९) असे या महाविद्यालयीन तरुणाचे नाव असून तो सिन्नर महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. देशमुख नगरमधील आश्वीनाथबाबा चौकातील रो-हाऊसमध्ये शुभम हा आईसह राहत होता. आई माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामाला होती. काल सकाळी आई कामावर गेल्यानंतर शुभम घरी एकटाच होता. त्याने घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरुममधील पंख्याला साडीने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. शुभमच्या बेडरुममधील खिडकी उघडी असल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याच्या शेजारील कुटूंबियांना शुभमने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. नगरसेवक पावसे यांनी लागलीच सिन्नर पोलीस ठाण्यात कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन फॅनला लटकलेला शुभमचा मृतदेह खाली उतरवुन घेत शवविच्छेदनासाठी नगरपालिका दवाखान्यात पाठविला. दरम्यान, शुभमच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ न शकल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.