चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने आणली रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:07 PM2020-01-04T23:07:39+5:302020-01-04T23:08:04+5:30
न्या. रानडे महोत्सवानिमित्त वैनतेय इंग्लिश मीडिअम स्कूल, वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, वैनतेय शिशुविहार आदी शाखांचे सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाले.
निफाड : येथील न्या. रानडे महोत्सवानिमित्त वैनतेय इंग्लिश मीडिअम स्कूल, वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, वैनतेय शिशुविहार आदी शाखांचे सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाले.
महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन घडवत सर्वांची मने जिंकली. यश कुंदे आणि ईश्वरी चोभे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. शिवांजली शिंदे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित स्वगत सादर केले. राधे राधे, मेरा जुता है जपानी, सुनो गौर से दुनियावालो, नमो नमो शंकरा, सूर निरागस हो, शेंदूर लावा म्हसोबाला, हरवली पाखरे, भाऊ मना सम्राट, खंडोबाची गीते आदी विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच समूह नृत्य सादर केले. यासह कथक नृत्य, गरबा नृत्य, कोळी नृत्य सादर केले. विद्यार्थिनी कावेरी नागरे हिने संगीताच्या तालावर रिदमिक योगा सादर केला. लावण्या शिंदे हिने महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बेटी बचाव हे स्वगत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व समूह गीत गायन करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
यावेळी कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, संस्थेचे विश्वस्त आप्पासाहेब उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, किरण कापसे, दिलीप वाघवकर, राजेश सोनी, मधुकर राऊत, विश्वास कराड, प्राचार्य डी.बी. वाघ, उपप्राचार्य रविकांत कर्वे, पर्यवेक्षक एस. एम. सोनवणे, प्राचार्य देवेंद्र सांबरे, पर्यवेक्षक पल्लवी सानप, मुख्याध्यापक सुजाता तनपुरे, मुख्याध्यापक प्रसन्ना कुलकर्णी आदींसह पालक उपस्थित होते.
रांगोळी स्पर्धांना प्रतिसाद
न्या. रानडे महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी निसर्गचित्र, फुलांची रांगोळी, ताटातील पाण्यात काढलेली रांगोळी आदी प्रकारात रांगोळ्या रेखाटून करून स्री भ्रूणहत्या थांबवा, लेक वाचवा, पृथ्वी वाचवा, झाडे वाचवा आदी सामाजिक संदेश दिले. या प्रदर्शनाला पालकांनी भेट पाहणी केली. रांगोळी स्पर्धेचे संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख एम. एस. पवार, भारती लंबाते, एस.एस. कापसे, संगीता चौधरी, एस.एन. पटेल, जी.जे. पंड्या यांनी केले.