कळसुबाई शिखरावरील मंदिराची रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:52 PM2019-09-23T22:52:56+5:302019-09-23T22:53:24+5:30

घोटी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला इगतपुरी तालुक्यात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी राज्यातील सर्वोच्च उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरावर कळसुबाई मंदिराची साफसफाई आणि रंगरंगोटी केली.

 The color of the temple at Kalsubai peak | कळसुबाई शिखरावरील मंदिराची रंगरंगोटी

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कळसुबाई शिखरावरील कळसुबाई मातेच्या मंदिराचे रंगकाम करतांना कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक.

googlenewsNext
ठळक मुद्देघोटी : नवरात्रोत्सवानिमित्त गिर्यारोहकांचा सातत्याने उपक्रम

घोटी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला इगतपुरी तालुक्यात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी राज्यातील सर्वोच्च उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरावर कळसुबाई मंदिराची साफसफाई आणि रंगरंगोटी केली.
गेल्या २३ वर्षांपासून कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक नवरात्रीच्या ९ दिवसांत रोज कळसुबाई मातेची महाआरती करतात. मंडळाकडून या कालावधीत घोटीपासून कळसुबाई शिखरापर्यंत गिर्यारोहण केले जाते.
नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी म्हणून मंडळाच्या गिर्यारोहकांनी कळसुबाई शिखरावर जाऊन कळसुबाई मातेच्या मंदिराची सालाबादप्रमाणे परिसराची स्वच्छता आणि त्यानंतर मंदिराला रंगरंगोटी केली. या धार्मिक व सामाजिक कार्यात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, अशोक हेमके, बाळू आरोटे, विकास जाधव, डॉ. महेंद्र आडोळे, निलेश आंबेकर, प्रविण भटाटे, बालाजी तुंबारे, ज्ञानेश्वर मांडे, सोमनाथ भगत, आदेश भगत, संतोष म्हसणे, प्रशांत जाधव आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.
 

Web Title:  The color of the temple at Kalsubai peak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर