ओझर येथे रंगला कुस्त्यांचा फड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 02:09 PM2019-12-04T14:09:05+5:302019-12-04T14:09:15+5:30
ओझर : चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्ती स्पर्धेत दत्ताचे शिंगवे येथील नारायण मार्कंड याने दिल्लीच्या सैय्यद दानिश पाशा या चितपट करत अकरा हजारांचे बक्षिस जिंकले.
ओझर : चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्ती स्पर्धेत दत्ताचे शिंगवे येथील नारायण मार्कंड याने दिल्लीच्या सैय्यद दानिश पाशा या चितपट करत अकरा हजारांचे बक्षिस जिंकले. यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी पिंप्री रोडवर जिल्हयातील अनेक पहिलवानांनी हजेरी लावली कुस्त्यांना प्रथेप्रमाणे गोडी शेव रेवडयांपासून प्रारंभ झाला. मालेगांव चापडगांव पिंपळनेर ओझर मोहाडी मिठसागरे भगूर लाखलगांव मनमाड अशा अनेक पहिलवानांच्या सहभागाने कुस्त्यांचा फड रंगला. यात्रा समितीने लावलेल्या नारायण मार्कंड ( दत्ताचे शिगवे ) याने अटीतटीची अकराशे रु पयांची कुस्ती जिंकली. त्याने सैय्यद दानिश पाशा दिल्ली याला चितपट केले. अकरा हजार रूपयांची अंतिम कुस्ती पंच यात्रा कमेटी अध्यक्ष धनंजय पगार अशोक शेलार रामू पाटील यांच्या हस्ते शेवटची कुस्ती लावण्यात आली. या अटीतटीच्या व चुरशीच्या कुस्तीत मार्कंड व सैयद शेवटपर्यंत घाम येईपर्यंत एकमेकांवर डाव करित होते. यात्रा कमेटीने चितपट झालीच पाहिजे असा आग्रह धरला शेवटी कुस्ती चितपट झालीच नारायण मार्कंड याचा खंडेराव मंदिरात यात्रा कमेटीच्या हस्ते सत्कार करून अकरा हजार रु पयांचे बक्षिस देण्यात आले.
कुस्ती फडाचे व बिक्षस पुकारण्यासाठी सूत्रसंचलन यात्राकमेटी कार्याध्यक्ष रामू पाटील कदम यांनी केले तर पंच म्हणून अध्यक्ष धनंजय पगार, उपाध्यक्ष युवराज शेळके, कार्याध्यक्ष रामू पाटील, राहूल शिंदे,दत्तात्रय घोलप, खजिनदार अशोकराव शेलार, मोतीराम शेळके, रज्जाक मुल्ला, माजी पंचायत समिती सदस्य प्रदिप अहिरे, कांचनराज जाधव, पंडितराव चौधरी, विनोद जाधव, राजेश बर्वे, नवनाथ चौधरी, रविंद्र रंजवे, अविनाश आंबेकर, भारत शेजवळ, पुस्कर जाधव, विक्र म शेजवळ, प्रशांत झोमन आदिंनी काम पाहिले.