जुन्या हिंदी गीतांची रंगली मैफल

By Admin | Published: November 23, 2015 12:00 AM2015-11-23T00:00:07+5:302015-11-23T00:02:41+5:30

जुन्या हिंदी गीतांची रंगली मैफल

A colorful concert of old Hindi songs | जुन्या हिंदी गीतांची रंगली मैफल

जुन्या हिंदी गीतांची रंगली मैफल

googlenewsNext

नाशिक : सजन रे झुठ मत बोलो..., तेरी निगाहो पे मर मर गये हम..., चला जाता हूं किसी की..., ये रात भीगी-भीगी..., माना जनाब ने पुकारा नहीं..., जा रे उड जा रे पंछी..., मेरा जुता हैं जपानी..., ये रात ये मौसम नदी का किनारा... अशा एकापेक्षा एक सरस जुन्या हिंदी गीतांची ‘भुली हुई यादें’ मैफलीत रसिक तल्लीन झाले.
निमित्त होते श्री सुंदरनारायण मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हरिहर भेट महोत्सवाचे! यावेळी साज और आवाजच्या वतीने प्रस्तुत जुन्या हिंदी गीतांचे बहारदार सादरीकरण गायक राजेश परदेशी, सुनील आव्हाड, रिटा डिसुजा यांनी केले. विविध गीतांनी मैफल गायकवर्गाने वाद्यवृंदाच्या साथीने उत्तरोत्तर खुलवत नेली. यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

Web Title: A colorful concert of old Hindi songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.