रंगपंचमीचा जल्लोष : रंगात रंगली ‘खाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:09 PM2018-03-04T22:09:01+5:302018-03-04T22:09:01+5:30

हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकत पोलिसांनी रंग उधळला. एकूणच अशाप्रकारे सामूहिकरीत्या रंगोत्सवाचा सण साजरा करत पोलिसांनी बंदोबस्ताचा ताणतणाव कमी करत कुटुंबासमवेत सण-उत्सवाचा आनंद लुटला.

The colorful 'khaki' | रंगपंचमीचा जल्लोष : रंगात रंगली ‘खाकी’

रंगपंचमीचा जल्लोष : रंगात रंगली ‘खाकी’

Next
ठळक मुद्दे ‘खाकी’ रंगात रंगून निघाल्याचे चित्र सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात एकत्र जमलेगोत्सवात पोलीस न्हाऊन निघाले

नाशिक : नेहमीच बंदोबस्त अन् गस्तीवर शहराची अंतर्गत सुरक्षा सांभाळणा-या पोलीस दलाने रविवारी (दि.४) रंगात रंगून सामूहिकरीत्या रंगपंचमीचा जल्लोष केला. यानिमित्ताने ‘खाकी’ रंगात रंगून निघाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
येत्या मंगळवारी रंगपंचमीनिमित्त बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलिसांना सज्ज रहावे लागणार आहे. यामुळे रंगपंचमीचा आनंद लुटण्यापासून पोलीस व त्यांचे कुटुंबीय वंचित राहू नये, यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी रविवारी सामूहिकरीत्या सकाळी रंगपंचमी उत्सवाचे आयोजन मुख्यालयात केले होते. सर्व पोलीस अधिकारी-कर्मचा-यांनी सकाळी मुख्यालयात सहकुटुंब उपस्थित रहावे, असा संदेश नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला. त्यानुसार सकाळी सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी मुख्यालयात एकत्र जमले. सिंगल यांनीही सहकुटुंब हजेरी लावत रंगोत्सवाचा आनंद द्विगुणित के ला. यावेळी जमलेल्या पोलिसांनी एकमेकांना कोरडा रंग लावत तसेच रंगमिश्रित पाण्याची उधळण करून रंगात चिंब भिजविले.

विविध हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकत पोलिसांनी रंग उधळला. एकूणच अशाप्रकारे सामूहिकरीत्या रंगोत्सवाचा सण साजरा करत पोलिसांनी बंदोबस्ताचा ताणतणाव कमी करत कुटुंबासमवेत सण-उत्सवाचा आनंद लुटला. सुमारे तासभर चाललेल्या या रंगोत्सवात पोलीस न्हाऊन निघाले होते.

 

Web Title: The colorful 'khaki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.