पाण्याच्या बाटल्यांपासून साकारले रंगीबेरंगी आकाशकंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 03:33 PM2019-10-15T15:33:05+5:302019-10-15T15:34:17+5:30
निफाड : दिवाळीचे वेध लागताच आठवण येते ती आकाशकंदीलाची. परंतु बाजारातील विकत घेतलेल्या आकाशकंदिलांपेक्षा स्वत: तयार केलेल्या आकाशकंदिलाची मौज ...
निफाड : दिवाळीचे वेध लागताच आठवण येते ती आकाशकंदीलाची. परंतु बाजारातील विकत घेतलेल्या आकाशकंदिलांपेक्षा स्वत: तयार केलेल्या आकाशकंदिलाची मौज काही वेगळीच असते. विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळविण्यासाठी निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेत आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून घरच्या घरी आकर्षक आकाशकंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, वह्यांचे पुठ्ठे, रिकामे खोके, जुने रंगीत कापड, वर्तमानपत्रातील रंगीत कागद, फुगे यांचा वापर करून आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्लास्टिक बॉटलचा पुनर्वापर करत कमी खर्चात व कमी वेळेत आकाशकंदील तयार तयार करण्यात चिमुकले दंग झाले. यंदाच्या दिवाळीत स्वत: तयार केलेला आकाशकंदील घरी लावण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.