रंगकर्मी राज्य नाट्य स्पर्धेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:32 AM2017-10-25T00:32:27+5:302017-10-25T00:32:38+5:30
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्राथमिक फेरीचे सोमवार (दि. ६) नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागानेदेखील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला असून, परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
नाशिक : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्राथमिक फेरीचे सोमवार (दि. ६) नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागानेदेखील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला असून, परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या स्पर्धा संपन्न होणार आहेत. नाशिक विभागातून या स्पर्धेसाठी २१ नाट्यप्रयोग सादर होणार असून, विविध संघांची स्पर्धेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. दिवाळीचा सण संपल्यानंतर कलाकार, नाट्यलेखकांसह संपूर्ण रंगकर्मींच्या तयारीने जोर धरला आहे. हौशी रंगकर्मी या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कलेचे सादरीकरण करणार आहेत. आॅफिस आणि कार्यालयीन कामकाज सांभाळून कलावंत स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. रोज साधारणत: तीन ते चार तास किंवा शनिवारी किंवा रविवारी अधिकाधिक वेळ देत स्पर्धेच्या दृष्टीने संहितावाचन, अभिनय सराव यांसह वेशभूषेवरदेखील कलाकार विशेष लक्ष देत आहेत.
नाट्यकर्मींसाठी पर्वणी असलेल्या या स्पर्धेतून अनेक चुरशीचे प्रयोग बघायला मिळणार आहेत. नवीन कलावंतांसाठी व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाºया या स्पर्धेत सगळ्याच रंगकर्मींची तयारी सुरू आहे. या राज्य नाट्य स्पर्धेचा शुभारंभ विजय नाट्य मंडळाच्या ‘हे रंग जीवनाचे’ या लेखक दिग्दर्शक नेताजी भोईर यांच्या नाटकाने होणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत मंगळवारी (दि. ७) विच्छा माझी पुरी करा, बुधवार (दि. ८) रक्तबीज, गुरुवार (दि. ९) ‘सतम तारा’, शुक्रवार (दि. १०) श्यामची आई, शनिवार (दि. ११) आणि धम्म, रविवार (दि. १२) सती न गेलेली महासती, सोमवार (दि. १३) पोशा, मंगळवार (दि. १४) प्रयास, बुधवार (दि. १५) एडिपस रेक्स, गुरुवार (दि. १६) वंशभेद, शुक्रवार (दि. १७) तितिक्षा, शनिवार (दि. १८) ये मामला गडबड हंै, सोमवार (दि. २०) ती रात्र, मंगळवार (दि. २१) अॅनिमल प्लानेट, बुधवार (दि. २२) नाव झालं पाहिजे, गुरुवार (दि. २३) छक्के पंजे, शुक्रवार (दि. २४) एक्झिट, तर मून विदाउट स्काय, शनिवारी (दि. २५) उत्तरदायित्व आणि चाहूल हे प्रयोग सादर होणार असून, या स्पर्धेसाठी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.