‘गोदास्पंदन’चा रंगारंग समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:54 AM2018-12-31T01:54:29+5:302018-12-31T01:55:15+5:30
सामूहिक गोदापूजन... आदिवासी कलावंतांकडून लोकनृत्याची धमाल... नदीवरच्या गीतांची बहारदार मैफल अन् कथक, भरतनाट्यम्चा कलाविष्कार अशा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘गोदास्पंदन’चा समारोप रविवारी (दि.३०) करण्यात आला.
नाशिक : सामूहिक गोदापूजन... आदिवासी कलावंतांकडून लोकनृत्याची धमाल... नदीवरच्या गीतांची बहारदार मैफल अन् कथक, भरतनाट्यम्चा कलाविष्कार अशा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘गोदास्पंदन’चा समारोप रविवारी (दि.३०) करण्यात आला.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, दिल्ली व संस्कार भारती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय ‘गोदास्पंदन’ महोत्सवाच्या समारोपप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे रामकुंडावर आयोजन करण्यात आले होते. रविवारी दुपारी तीन वाजता हरसूल येथील एका दुर्गम पाड्यावरील कलापथकाने आदिवासी लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कलापथकातील कलावंतांनी सुमारे तासभर तारपी वाद्याच्या तालावर विविध प्रकारचे लोकनृत्य सादर केले.
संध्याकाळी गोदाकाठावर ‘संगीत रजनी’ ही नदीवरील गीतांवर आधारित मैफल उत्तरोत्तर खुलत गेली.