गोवयांमध्येच रंगतात ‘त्यांचे’ होळीचे रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:01 AM2018-03-01T01:01:34+5:302018-03-01T01:01:34+5:30
संपूर्ण देश होळीच्या सप्तरंगी रंगांची उधळण करून आपल्या सोनेरी आयुष्यात रंग भरत असताना दुसरीकडे याच देशातील आदिवासी कष्टकरी जनता मात्र शेण व गोवºयांमध्येच आपले बेरंग झालेले जीवन रंगीन करताना दिसून येत आहे.
पेठ : संपूर्ण देश होळीच्या सप्तरंगी रंगांची उधळण करून आपल्या सोनेरी आयुष्यात रंग भरत असताना दुसरीकडे याच देशातील आदिवासी कष्टकरी जनता मात्र शेण व गोवºयांमध्येच आपले बेरंग झालेले जीवन रंगीन करताना दिसून येत आहे. देशभर होलिकोत्सव दरवर्षी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. ग्रामीण भागाबरोबर शहरी वस्तीत या सणाची रंगत आधिक दिसून येते. शहरात चौकाचौकात, सोसायट्या, बंगले व चाळीत होळी साजरी केली जाते. यासाठी लागणाºया गोवºया पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील कष्टकरी मजूर होळीच्या आदल्या दिवशी घेऊन शहरात दाखल होत असतात. वरवर साध्या दिसणाºया या गोवºया जवळपास सहा महिन्यांपासून थापायला सुरुवात करावी लागते. दिवाळीचा सण झाल्यापासून गायी, म्हशींच्या शेणापासून व त्यात गवत टाकून गोवºया थापतात. एक एक गोवरी वाळवून त्याचा साठा करून ठेवला जातो. होळीच्या पूर्वसंध्येला भाडोत्री वाहनातून गोवºया नाशिकच्या पंचवटी, पेठरोड, गंगाघाट आदी ठिकाणी रस्त्यावर जागा मिळेल तेथे विक्रीसाठी ठेवल्या जातात. रक्ताचे पाणी करून तयार केलेल्या गोवºया विकून कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यात येतो.
गावाकडे होळीची पारंपरिक यात्रा, सण सोडून अनेक कुटुंब ऐन सणवाराला रस्त्यावर वास्तव्य करून राहतात. वर्षभराची पोटाची खळगी भरण्यासाठी सणाचा आनंद बाजूला ठेवून आदिवासी कष्टकरी गोवºया विकण्यात दंग असतात. चारशे रुपये शेकड्यापासून या गोवºयांना भाव मिळत असला तरीही होळीच्या दिवशी शिल्लक गोवºया मिळेल त्या भावात विकून घराची वाट धरतात.