मतमोजणीची रंगीत तालीम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:01 AM2018-05-24T01:01:59+5:302018-05-24T01:01:59+5:30
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करीत रंगीत तालीम घेतली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंंगल यांनीही मतमोजणी केंद्राला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करीत रंगीत तालीम घेतली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंंगल यांनीही मतमोजणी केंद्राला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार असली तरी, मतमोजणी अधिकारी व कर्मचाºयांना सकाळी साडेसहा वाजताच उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मतमोजणी तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रारंभी मतपत्रिका तयार करून डमी मतदान करून घेण्यात आले व त्यात वैध, अवैध व संशयित मतपत्रिका कशा ओळखाव्या याचे प्रात्यक्षिके देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या पद्धतीची माहिती कर्मचायांना देण्यात आली.
एकूण वैध मतांवरून विजयी होण्यासाठी कोटा ठरवून त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली व प्रत्येक उमेदवाराच्या नावे करण्यात आलेल्या पेटीत त्याच्या नावाची मतपत्रिका टाकण्यात येऊन त्याची मोजणी करण्यात आली. साधारणत: दोन तास चाललेले हे प्रशिक्षण व रंगीत तालीम यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन्, सहायक अधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, वासंती माळी, अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार गणेश राठोड, शरद घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनीही मतमोजणी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.