विजेचा बसेना मेळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:08 PM2018-11-27T17:08:18+5:302018-11-27T17:08:55+5:30

खेडलेझुंगे : राज्यातील शेती आणि शेतकºयांसंदर्भात सरकार घेत असलेले काही निर्णय शेतकºयांना अडचणीचे ठरत आहेत. कृषिपंपांसाठी देण्यात येणाºया विजेच्या ...

Combining electricity, game with farmers' lives | विजेचा बसेना मेळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ

विजेचा बसेना मेळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ

googlenewsNext
ठळक मुद्देभरनियमनामुळे पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडले

खेडलेझुंगे : राज्यातील शेती आणि शेतकºयांसंदर्भात सरकार घेत असलेले काही निर्णय शेतकºयांना अडचणीचे ठरत आहेत. कृषिपंपांसाठी देण्यात येणाºया विजेच्या वेळेत झालेल्या बदलामुळे शेतकरी बेजार झालेले आहे. सप्ताहातील सोमवार ते गुरु वार रात्री ११ ते ७ वाजेपर्यंत शुक्र वार ते रविवार सकाळी ७.३० ते ३.३० पर्यंत वीज देण्यात येते. परिणामी परिसरातील शेतकºयांना दिवस-रात्र शेतातच मुक्काम करण्याची वेळ आली आहे. मध्यरात्री वीज येण्यामुळे पिकांना पाणी देणे त्रासदायक ठरणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी साप, विंचवासह हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यासही सामोरे जावे लागणार आहे.
परिसरात सोमवार ते गुरु वार रात्री व शुक्र वार ते रविवार दिवसा थ्री फ्रेज वीज दिली जाते. उद्योगाच्या तुलनेत कृषिपंपांसाठी फार कमी वीज दिली जाते. दिवसाकाठी अवघ्या आठ तास उपलब्ध होणाºया विजेत शेतकºयांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
अवकाळी पाऊस आणि शेत मालालाही बाजार नाही त्यामुळे आधीच शैतकरी हैराण झालेला आहे.
त्यात याप्रमाणे भरनियमन असल्याने शेतमजुरांच्या मजुरीतही वाढ झालेली आहे. कारण ज्या दिवशी रात्री लाईट असते त्या दिवशी शेतमजुरांना सुट्टी द्यावी लागते. जर शेतमजुर दुसºया ठिकाणी कामास निघुन गेला तर पुन्हा शेतकºयांसमोर शेतमजुर शोधण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे ५-६ हजार एकरी कांदा लागडीची मजुरी ही तब्बल ८-१० हजार रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी अजुन कर्जबाजारी होणार आहे.
शुक्र वार ते रविवार सकाळी ७.३० वाजता लाईट असते परंतु शेतीवर शेतमजुर कामकाजासाठी येत नाही. तसेच दुपारी ३.३० ला विज जाणार असल्याने त्यापुढे लागवडीचे किंवा इतर शेतीचे कामे बंद ठेवावी लागत आहे. परिणामीे शेतकºयांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
खेडलेझुंगे येथील गोरख गायकवाड या शेतकºयांचे शेतात कांदा लागडीचे काम सुरु आहे. परंतु विजेच्या भारिनयमनामुळे शेतमजुर मिळणे अवघड होवुन बसले होते. यावर त्यांनी विज निर्मिती करणारा यंत्र ट्रॅक्टरला बसविले. त्यासाठी एका तासाला २ ते ३ लिटर डिझेलचा खर्च होणार आहे. परंतु हा आर्थिक भार सोसुन त्यांनी कांदा लागवड सुरु ठेवलेली आहे. त्यांना एकरी लागवडीकामी येणारा डिझेल खर्च ८००० (एका तासासाठी) २४० शेत बांधणे २००० एकर याप्रमाणे खर्च फक्त लागडीसाठी येणार आहे.
विजेच्या वेळेत बदल करा
तांत्रिक बिघाड झाल्यास मिहना मिहना वीज गायब होणार असल्याने शेतकर्यांना पिकांसाठी पाण्याचे चक्र पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मध्यरात्री देण्यात येणाºया विजेच्या वेळेत बदल करण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. मध्यरात्री वीज येण्यामुळे पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरणार आहे. त्याऐवजी सकाळी दहा सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्घ करावी. दहा तास दिली जाणारी वीज आता आठ तासांवर आणण्यात आली आहे. यामुळे पिकांना पाणी देण्याचे शेतकºयांचे नियोजन कोलमडणार आहे.
सहकारी व संघटीत करण्यात येणाºया पाणीपुरवठा योजना अडचणीत येणार आहेत. सरकारकडून सातत्याने शेतकºयांसोबत दुजाभाव केला जात असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
सरकार आणि विज वितरम कंपन्या शेतकºयांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसुन येते. मध्यरात्री देण्यात येणारी वीज शेतकºयांसाठी तोट्याची आहे. अनेक महिला शेतकºयांना तर पिकांना पाणी देता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करण्यात यावे.
रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकºयांना आता शेतात मुक्कामाची वेळ आली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके सुकू नयेत, यासाठी मोठ्या प्रयत्नाने उपलब्ध होईल तेथून पाणी आणून शेतकरी पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र भारनियमनाच्या वेळेत जाचक बदल करून वीज वितरण कंपनी शेतकºयांच्या जीवाशी खेळत आहेत.
मी मागील एक ते दिड महिन्यापासुन कांदा लागवडीसाठी मजुर शोधत आहे. विजेचा लपंडाव, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव नाही, पाण्याची सोय नाही त्यामुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यात सरकार आणि विज वितरण कंपन्या शेतकºयांकरीता असहकार करीत असल्याने मध्यरात्री देण्यात येणारी वीज शेतकºयांसाठी तोट्याची आहे. अनेक महिला शेतकºयांना तर पिकांना पाणी देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करण्यात यावे.
- गोरख गायकवाड, शेतकरी.

Web Title: Combining electricity, game with farmers' lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी