‘समृद्धी’ राक्षसाचे शेतकºयांकडून दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:21 AM2017-10-01T01:21:24+5:302017-10-01T01:21:30+5:30
बागायती भागातील शेतकºयांच्या उरावरून ‘समृद्धी’नामक राक्षस जात असल्याचा आरोप करीत तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांनी त्याचे दहन करीत प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला.
सिन्नर : बागायती भागातील शेतकºयांच्या उरावरून ‘समृद्धी’नामक राक्षस जात असल्याचा आरोप करीत तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांनी त्याचे दहन करीत प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला. सिन्नर तालुक्यातील काही गावातील शेतकरी समृद्धी महामार्गासाठी जमिनींची खरेदी देत असले तरी पश्चिम पट्ट्यातील बागायती भागात समृद्धी महामार्गाला विरोध मावळला नसल्याचे शेतकºयांनी दाखवून दिले.
या महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी शिवडे येथील शेतकरी विजयादशमीच्या सायंकाळी चौकात मंदिरासमोर एकत्र आले. समृध्दी महामार्ग रद्द झालाच पाहिजे, जमिन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची.. अशा अनेक घोषणा दिल्या. यावेळी शेतकºयांनी समृद्धीनामक राक्षस बनविला होता. त्याचे दहन चौकात करण्यात आले. महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार यावेळी समृद्धीबाधीत शेतकºयांनी व्यक्त केला. यावेळी समृद्धीबाधीत शेतकरी उपस्थित होते.
बागायती भागातून अद्याप विरोध
च्प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सिन्नर तालुक्यातून प्रस्तावित आहे. त्यासाठी जमिनी खरेदी करण्याच्या प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यातील सुमारे १२०० शेतकरी या महामार्गामुळे बाधीत होत आहे. त्यापैकी ५४ शेतकºयांनी जमिनींची खरेदी दिली आहे. जिरायती भागातून जमिनींची खरेदी दिली जात असली तरी पश्चिम पट्ट्यातील बागायती भागातील गावांतून या महामार्गासाठी विरोध होत आहे.