नांदूरशिंगोटेत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
By admin | Published: June 6, 2017 01:55 AM2017-06-06T01:55:07+5:302017-06-06T01:55:17+5:30
नांदूरशिंगोटे : शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक परिसरात सोमवारी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.
नांदूरशिंगोटे : शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक परिसरात सोमवारी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी मुख्यमंत्री, जयाजी सूर्यवंशी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दहन करण्यात आले. चास व कासारवाडी भागात शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. नांदूरशिंगोटे येथील उपबाजार आवारात कांदा आवक न झाल्याने शुकशुकाट होता. नांदूरशिंगोटे व परिसरात पाचव्या दिवशी शेतकरी संपाची तीव्रता वाढली आहे. शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी जनजागृती सुरू आहे. नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रुक, चास, नळवाडी, कासारवाडी, मानोरी, कणकोरी, मऱ्हळ, दोडी खुर्द, दापूर, चापडगाव, माळवाडी, गोंदे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. भाजीबाजार, आठवडे बाजार, दूध संकलन केंद्रे, बाजारपेठ, हॉटेल व्यावसायिक, वाहूतक व्यवसाय, फळबाजार, उपबाजार आदी सर्व व्यवहार गेल्या पाच दिवसांपासून ठप्प आहे. परिसरातील नांदूरशिंगोटे हे महत्त्वपूर्ण गाव असून, २५ गावांचे मध्यवर्ती बाजारपेठेचे गाव आहे.