कमको बँकेला पावणेदोन कोटींचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:43+5:302021-04-16T04:13:43+5:30

महाजन यांनी सांगितले की, गेले वर्षभर कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच मध्यंतरी अवकाळी पावसानेही बरेच नुकसान केले. अशाही ...

Comco Bank makes a profit of Rs 52 crore | कमको बँकेला पावणेदोन कोटींचा नफा

कमको बँकेला पावणेदोन कोटींचा नफा

Next

महाजन यांनी सांगितले की, गेले वर्षभर कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच मध्यंतरी अवकाळी पावसानेही बरेच नुकसान केले. अशाही अशाही परिस्थितीत बँकेने कर्जावरील व्याजदर वेळोवेळी कमी केले, बँकेच्या संचालक मंडळासह सर्व कर्मचारी, कर्ज वसुली प्रतिनिधी यांनी अत्यंत कठोर मेहनत घेत थकबाकी वसुली व एनपीए वाढणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळेच कोरोना काळात बँकेस ६ कोटी ८८ लाख ७६ हजारांचा ढोबळ नफा झाला आहे.

बँकेचे वसूल भागभांडवल ४ कोटी ६९ लाख ३ हजार रुपये असून गंगाजळी ३० कोटी ४० लाख २४ हजार रुपये तर सरकारी रोखे ९० कोटी ५२ लाख ७ हजार रुपये आहे. विविध वित्तीय संस्थांमध्ये एकूण ठेवी १९० कोटी २७ लाख ६२ हजार रुपये असून यामध्ये मागील वर्षापेक्षा १३ कोटी २० लाखाने ठेवीमध्ये वाढ झाली आहे. बँकेने सभासद व्यापारी, व्यावसायिक, बेरोजगार, युवक, महिला आणि उद्योजक यांना १०१ कोटी ५७ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

बँकेचे खेळते भांडवल २३९ कोटी ७१ लाख ४८ हजार रुपये असून वित्तीय संस्थामध्ये ११२ कोटी १० लाख ४९ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँकेची थकबाकी मागील वर्षीपेक्षा ४.३ टक्क्यांनी कमी झाली असून रिजर्व बँकेच्या निर्देशांकनुसार बँकेचा नेट एनपीए हा ५.९२ टक्के ठेवण्यात यश आले आहे. येत्या काळात सभासदांसाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष नितीन वालखडे यांनी सांगितले.

यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते.

आगामी काळात कर्जावरील व्याजातही कपात करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. तसेच सभासद केंद्रबिंदू ठरवत सभासदांना विश्वासात घेऊन बँकेच्या विकासाचे निर्णय घेतले जातील.

- सुनील महाजन, अध्यक्ष, कमको बँक

फोटो- १४ सुनील महाजन

===Photopath===

140421\361014nsk_37_14042021_13.jpg

===Caption===

फोटो- १४ सुनील महाजन

Web Title: Comco Bank makes a profit of Rs 52 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.