अधिकारी बनून मंत्रालयात पुन्हा या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 07:42 PM2020-02-27T19:42:12+5:302020-02-27T19:42:37+5:30
नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक १८ मधील २५ विद्यार्थिनी मुंबईला विधानसभा व विधान परिषद कामकाज पाहणीसाठी गेले असता या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची मंत्रालयात जाऊन भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चांगले शिक्षण घेऊन आयपीएस, आयएएस अधिकारी बनून पुन्हा मंत्रालयात या असा आपुलकीचा सल्ला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या महापालिकेतील विद्यार्थिनींशी संवाद साधला.
नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक १८ मधील २५ विद्यार्थिनी मुंबईला विधानसभा व विधान परिषद कामकाज पाहणीसाठी गेले असता या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली व सवांद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची आपुलकीने चौकशी करून कौतुकही केले. त्यानंतर अर्थमंत्री जयंत पाटील, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगनराव भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर यांसह अन्य नेत्यांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच विधानसभा व विधानपरिषदेच्या कामकाजाची माहिती घेतली. दरम्यान मुंबई दर्शनात गेट-वे आॅफ इंडिया, सायन्स सेंटर, हॅँगिंगगार्डन, चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनसला भेटी देऊन माहिती करून घेतली. या विद्यार्थ्यांसोबत सातपूर प्रभाग सभापती संतोष गायकवाड, मुख्याध्यापक कैलास ठाकरे तसेच कुंदा शिंदे, वैशाली भामरे, अमित शिंदे आदी शिक्षक होते.