संमेलनासाठी आ. सीमा हिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:17 AM2021-02-09T04:17:10+5:302021-02-09T04:17:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आवश्यक ती सर्व मदत स्वत: तसेच भाजपचे तिन्ही आमदार, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आवश्यक ती सर्व मदत स्वत: तसेच भाजपचे तिन्ही आमदार, महापौर करण्यास कटिबद्ध आहोत. केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर प्रत्यक्ष उपस्थित राहून हे संमेलन यशस्वी करण्यात योगदान देऊ, असे सांगून आ. सीमा हिरे यांनी १० लाखांच्या निधीचे पत्र संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.
गोएसोमधील संमेलनाच्या कार्यालयात सोमवारी (दि.८) बैठक झाली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अनिल भालेराव, महेश हिरे, विश्वास ठाकूर यांच्यासह लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे कार्यवाह सुभाष पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी, संजय करंजकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, दिलीप साळवेकर, चंद्रकांत दीक्षित, किरण समेळ, भगवान हिरे, अमोल जोशी, विनायक रानडे, रमेश देशमुख, श्याम पाडेकर, सी.एल. देशपांडे आदी उपस्थित होते.