पुढच्या वर्षी लवकर या !

By admin | Published: September 16, 2016 10:05 PM2016-09-16T22:05:21+5:302016-09-16T22:05:46+5:30

गणरायाला निरोप : जिल्ह्यात ठिकठिकाणी लक्षवेधी मिरवणुका

Come on next year! | पुढच्या वर्षी लवकर या !

पुढच्या वर्षी लवकर या !

Next

नाशिक : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करु न बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून घराघरांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत गणेशभक्तांनी गर्दी केली होती.येवल्यात मल्लखांब प्रात्याक्षिके
४येवला : ढोल ,ब्यांजो ,संबळ ,या वाद्याच्या तालासुरात अनंतचतुर्दशीला विविध कसरतीचे प्रयोग दाखवत येवल्यातील विविध गणेश मंडळानीपुढील किमान वर्ष भराच्या कालावधी साठी अधिक उत्साह मिळेल या श्रद्धेने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.वरु णराजाने अनेक वर्षानंतर यंदा विसर्जन मिरवणुकीत जोरदार हजेरी लावली आण िगणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत केला.झांज,काठी लाठी,आगगोळ्याचे प्रयोगासह जुनी आखाडी मच्छ कच्छ गणपती-शारदा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली .मुख्य मिरवणुकीत 17 गणेश मंडळे सहभागी झाली होती.
४नामदेव व्यायाम शाळा व जाईचा मारु ती तालीम संघाने 125 वर्षाची परंपरा असलेली येवल्याची आखाडीत पारंपारिक आखाडीचे प्रदर्शन केले.जय मल्हार खंडेराया, वाघ्या मुरळी, कच्छ मच्छ ,गणराया ,.शरदा गणपतीच्या वेशभूषेत नृत्य, मच्छ कच्छ,खंडेरायाचे नृत्य,आण िदेवदेवतांचे विविध वेशभूशेतील नृत्य, ओम साईरामचा अवतार,सादर केला.विविध व्यायामशाळेचे चित्तथरारक प्रात्यिक्षके सादर केली.धोंडीराम वस्ताद ,खडू वस्ताद,बुंदेलपुरा तालीम संघाच्या पिहलवानांनी आग का गोला यासह चकरी फिरवण्याचे प्रात्यिक्षक दाखवले ते डोळ्याचे पारणे फेडणारे होते.
४अखेरीस शेवटचा मनाचा परदेशपुरा तालीम संघाचा गणपती आझाद चौकात आला.यंदा पोलिसांच्या सुयोग्य नियोजनामुळे कार्यकर्त्यांना आपली प्रात्यिक्षके चांगली दाखवता आली.यामुळे पोलिसांच्या नियोजनाला विविध मंडळांनी सलाम केला.

Web Title: Come on next year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.