...पहिले नाश्ता कार्य करायला या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:58+5:302021-07-30T04:15:58+5:30
----------------------- अहो काका मीच तो... एका सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रारंभ होण्यापूर्वी कार्यक्रमाशी संबंधित काही मोजक्याच व्यक्ती सभागृहाबाहेर गप्पा मारत होत्या. ...
-----------------------
अहो काका मीच तो...
एका सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रारंभ होण्यापूर्वी कार्यक्रमाशी संबंधित काही मोजक्याच व्यक्ती सभागृहाबाहेर गप्पा मारत होत्या. कोरोनाचा काळ असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क होता. तेवढ्यात अजून दोन-तीन व्यक्ती तिथे येऊन त्या ग्रुपमधीलच असल्याप्रमाणे गप्पांमध्ये सहभागी झाल्या. त्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा म्हणजे डोळे ओळखीचे वाटले. त्यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकाने सहजपणे विचारले, “अहो, तुम्ही त्या अमुकचे भाऊ का हो?” त्यावर त्या माणसाने चेहऱ्यावरचा मास्क बाजूला काढला, तरी त्या काकांना ओळख पटली नाही. तेव्हा त्या व्यक्तीने वर्षभरापासून लावत असलेल्या विगकडे बोट दाखवत सांगितले, अहो काका तो अमुक मीच. हा विग आणि मास्क असल्यानेच तुम्ही ओळखू शकला नाहीत. आता त्या काकांनाही ओळख पटल्यावर मग मात्र त्यांनी त्या ‘टकल्य”च्या विगला हात लावत तो अमुकच असल्याची खात्री केली, आता बोला.
--------------------