दिंडोरी तालुक्यातील खरिप हंगामातील कामे अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:56 PM2020-07-28T22:56:08+5:302020-07-29T00:46:59+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरातील शेतकरीवर्गाची खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनेक संकटांशी दोन हात करत बळीराजाने यंदाचा हंमाग घेतला आहे. त्यामुळे केलेल्या कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरातील शेतकरीवर्गाची खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनेक संकटांशी दोन हात करत बळीराजाने यंदाचा हंमाग घेतला आहे. त्यामुळे केलेल्या कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.
रब्बी हंगामात आपल्याजवळील सर्व भांडवल खर्च करून बळीराजाने पिके घेतली. पिकांनी चांगली साथ दिल्याने शेतकरीवर्गाच्या अपेक्षा उंचावल्या. सुरुवातीच्या काळात काही पिकांनी शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळून दिला. आता सुगीचे दिवस येतील, आपल्या कष्टाचा पूर्ण मोबदला मिळेल, अशी स्वप्ने रंगवण्यात शेतकरी दंग असातानाच अस्मानी व सुलतानी संकटांची मालिका सुरू झाली. यामुळे रब्बी हंगामातील शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागला.
टामाटे फेकून द्यावे लागले. कष्टाने पिकवेल्या टमाट्याचा डोळ्यांसमोर लाल चिखल पाहावा लागला. कोथिंबीर शेतकऱ्यांना थोडाफार आधार दिला. तोपर्यंत द्राक्ष पीक तयार झाले.
हंगामात झालेला तोटा भरून निघेल,या आशेवर बळीराजा बसला होता; मात्र या काळात कोरोना महामारी आली अन् सर्व लॉकडाऊन झाले. पिकवलेला शेतमाल शेतातच लॉक झाला. बाजार समित्या, वाहतूक बंद असल्याने भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागला.
या भागातील शेती पावसावर अवलंबून आहे. ज्यांच्या शेतात पाणी उपलब्ध आहे ते भाताला पाणी भरू शकतात; पण ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध नाही त्यांना भाताचे पीक नष्ट होताना पाहण्याची वेळ आली आहे.लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला. लाखो रुपये खर्च करून पिकवलेला शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र सर्व दु:ख पचवत शेतकºयांनी पुन्हा जोमाने खरीप हंगामात उभारी घेतली आहे. यंदातरी कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा शेतकºयांनी बाळगली आहे.