नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 08:26 PM2020-05-15T20:26:04+5:302020-05-15T20:26:50+5:30

भारत प्रतिभूती मुद्रणालय मध्ये एन.जे एस.पी., इलेक्शन सील, सरकारी धनादेशाची कामे रखडली आहेत. ती कामे सोमवारी मुद्रणालय सुरू झाल्यानंतर प्राधान्याने करण्यात येणार आहे.

Commemorative printing press started | नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय सुरू

नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय सुरू

Next
ठळक मुद्देसोमवारी मुद्रणालय सुरू करण्यात येणार

नाशिकरोड : येथील नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय सुरू करण्यात आले असून भारत प्रतिभूती मुद्रणालय येत्या 18 मेपासून गरजेनुसार टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.
मुद्रणालय मजदूर संघाची व मुद्रणालय व्यवस्थापन यांची नुकतीच बैठक पार पडून मुद्रणालय सुरू करण्याबाबत विचारविमर्श करण्यात आला त्यानुसार चलार्थ पत्र मुद्रणालय गुरुवारपासून सुरू करण्यात आले असून फक्त दोनशे कामगारांना कामावर घेण्यात आले आहे टप्प्याटप्प्याने मुद्रणालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे चलार्थ पत्र मुद्रणालयात नोटा छपाई संदर्भातील कामे सुरु करण्यात आली आहे तर भारत प्रतिभूती मुद्रणालय सोमवार 18 मे पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची मजदुर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.
भारत प्रतिभूती मुद्रणालय मध्ये एन.जे एस.पी., इलेक्शन सील, सरकारी धनादेशाची कामे रखडली आहेत. ती कामे सोमवारी मुद्रणालय सुरू झाल्यानंतर प्राधान्याने करण्यात येणार आहे. परफोरेशन व एक्झामिनेशनचे काम तसेच बाईंड्रीमधे कटिंग आणि हँन्ड नंबरींग, सी.एस.डी./स्टोअर तसेच एक्साईज सीलचे प्रिंटिंग काम देखील प्रथम सुरु होईल. जे कामगार कॅन्टोमेंट झोनमध्ये आहेत किंवा आजारी आहेत, त्यांना सध्या बोलविले जाणार नाही. लॉकडाऊन जसजसे शिथील होईल, तसतसे टप्प्या टप्प्याने उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. कामावर बोलविलेल्या कामगारांनी सोशल डिस्ट्न्स, वारंवार हात धुणे, सँनिटायझरचा वापर, मास्क, हँन्ड ग्लोव्हज यांचे नियम पाळावे लागणार आहे. ज्या कामगारांचा संपर्क पुणे, मुंबई, मालेगांव, औरंगाबाद येथील किंवा परदेशी अथवा कोरोनाग्रस्ताशी, त्यांच्या नातेवाईकांशी आला असेल त्यांनी प्रशासनाला याची कल्पना द्यावी अन्यथा त्या कामगारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कँटीन मधून संसर्गाचा धोका असल्यामुळे कँटीन बंद राहील. गरजेनुसार वेगवेगळे विभाग टप्प्या टप्प्याने सुरु होतील. लॉकडाऊन काळात जे कामगार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचे फंड पेमेंट व कम्बाईन धारक सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शन लवकरात लवकर कशा सुरू करण्यात येतील यासाठी मुख्यालयाला सुचना द्याव्यात असे बैठकीत मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कामगारांचे मेडिकल बील थकले आहेत त्यांच्यासाठी संबंधीत क्लार्कला बोलावून काम सुरू करण्यात यावे ही सुचना देखील व्यवस्थापनाला करण्यात आली.

Web Title: Commemorative printing press started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.