कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 08:48 PM2020-06-20T20:48:25+5:302020-06-20T23:48:52+5:30
सिन्नर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ च्या लाभार्थींची गावनिहाय यादी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून द्यावे व कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणारी ही योजना जाहीर केल्यानंतर तालुक्यातील सोनांबे येथे आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफी देण्यात आली. मात्र, त्यानंतर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका लागल्याने आचारसंहिता लागू झाली आणि गावनिहाय शेतकºयांच्या याद्या जाहीर करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकºयांना मिळू शकला नव्हता. त्यानंतर कोरोनाच्या महामारीमुळे कर्जमाफी मिळण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकºयांची यादी जाहीर होऊ शकली नव्हती.
आता गावातील शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून, शेतकºयांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले नाव शोधून प्रमाणीकरण करून द्यावे व कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक निबंधक रुद्राक्ष यांनी केले आहे.तालुक्यातील सर्व विकास सोसायटी सचिवांनाही सूचना देण्यात आल्या असून, शेतकºयांनी त्यांच्याशी संपर्क साधून यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी व त्यानंतरच आपले सरकार केंद्रात जाऊन प्रमाणीकरण करून द्यावे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ घेणे शक्य होणार असल्याचेही रूद्राक्ष म्हणाले.