मालेगावी ज्येष्ठांच्या काेविड लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:26 AM2021-03-04T04:26:06+5:302021-03-04T04:26:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुक्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांचे काेविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरणासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांचे काेविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरणासाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड व जन्म तारखेचा पुरावा साेबत आणावा, असे आवाहन पंचायत समिती आराेग्य विभागाने केले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबर २०२० राेजी वयाची ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काेविड लस दिली जात आहे. तालुक्यातही याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे वय ४५पेक्षा अधिक आहे. मात्र, ते दीर्घ आजाराने ग्रस्त असले तरी त्यांनाही लस दिली जाईल. अशा नागरिकांनी आधारकार्ड, जन्म तारीख पुरावा, आजाराचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. काेराेनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. सध्या तालुक्यात १४ काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागरिकांनी खबरदारी घेत लसीकरणाचा लाभ घ्यावा. यासाठी तातडीने जवळील आराेग्य केंद्राशी संपर्क साधून लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
------------
दाभाडी, वडनेर खाकुर्डी येथे लसीकरणाचा शुभारंभ झाला. तर बुधवारी साैंदाणे, निमगाव, कळवाडी, चिखल ओहाेळ व वडनेर येथे लसीकरणाला सुरवात झाली ज्येष्ठांचा प्रतिसाद मिळाल्यास सर्वच प्राथमिक आराेग्य केंद्रांवर लसीकरणाचे नियाेजन केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.