बांधावर खत योजनेचा बंधारपाडा येथे शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:41+5:302021-05-27T04:14:41+5:30
तालुक्यातील बंधारपाडा या आदिवासी, दुर्गम भागात आमदार पवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पाच टन युरिया खत बांधावर वाटप ...
तालुक्यातील बंधारपाडा या आदिवासी, दुर्गम भागात आमदार पवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पाच टन युरिया खत बांधावर वाटप करून योजनेस प्रारंभ करण्यात आला. या योजनेबरोबर तालुक्यात बीजप्रक्रिया मोहीम, दहा टक्के रासायनिक खतांची बचत, सोयाबीन उगवणक्षमता चाचणी, बीबीएफद्वारे पेरणी आदी योजना कृषी विभागाने हाती घेतल्या आहेत. तालुक्यात जास्तीत जास्त खते ही बांधावर पुरविण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना आमदार पवार यांनी यावेळी कृषी विभागाला दिल्या. यावेळी कार्यक्रमास तहसीलदार बी.ए. कापसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, उपसभापती विजय शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, सरपंच दीपक राजपूत, मंडळ कृषी अधिकारी पाखरे, भदाणे, कृषी पर्यवेक्षक पटेल, महाले, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते.
इन्फो
उगवणक्षमतेचे प्रात्यक्षिक
बिलवाडी येथील शेतकऱ्यांना घरातील सोयाबीन बियाणे वापरताना उगवणक्षमता कशी तपासावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कोरोनाच्या कठीण प्रसंगात कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नियोजनाबद्दल आमदार नितीन पवार यांनी समाधान व्यक्त केले. कृषी विभागाच्या या मोहिमांचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले.