मनरेगाच्या कामाला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:18 PM2020-04-29T17:18:47+5:302020-04-29T17:18:55+5:30

अलंगुण : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने सुरगाणा तालुक्यातील हातावरचे पोट असणा-या गोरगरीब मजुरांची बिकट अवस्था झाली असतांना तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला प्रारंभ झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 Commencement of MNREGA work | मनरेगाच्या कामाला सुरवात

मनरेगाच्या कामाला सुरवात

Next

अलंगुण : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने सुरगाणा तालुक्यातील हातावरचे पोट असणा-या गोरगरीब मजुरांची बिकट अवस्था झाली असतांना तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला प्रारंभ झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजीत गावित यांच्या प्रयत्नातून शासनाकडून कोरोनाच्या पाशर््वभूमीवर तालुक्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी मंजूर करून घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात लाडगाव (सुरगाणा) येथे (दि.२८ ) गोरगरिबांच्या रोजगारासाठी मनरेगा अंतर्गत तलावातील गाळ काढणे,खड्डे खोदणे ही कामं सुरू केली आहेत.यामुळे गोरगरीब-मजूरांना ‘गावाचचं काम आणि गावातच रोजगार’ या तत्त्वाप्रमाणे रोजगार उपलब्ध झाला आहे.प्रतिदिवास २३८ रूपये या प्रमाणे मजुरी मिळणार आहे.
त्यासाठी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीत ६१ कामं सुरू करीत असल्याचे पंचायत समितीचे सभापती मनीषा महाले व उपसभापती इंद्रजीत गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी लाडगाव येथील सुमारे ११० गरजू महिला व पुरु षांना काम मिळाले असून यामुळे गोरगरीब मजुरांत समाधान व्यक्त केले जात आहे. या कामात तलावातील साचलेला गाळ काढणे याबरोबरच वृक्षारोपणाची पूर्वतयारी म्हणून खड्डे खोदणे या अकुशल कामांचा रोजगार हमीच्या पहिल्या टप्प्यात समावेश आहे. अशी माहिती पं.स.चे गटविकासअधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.
राज्य शासनाकडून सुरगाणा तालुक्यासाठी ४८०५ काम मंजूर केली असून ती तालुक्याच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. कोविड १९ च्या पाशर््वभूमीवर देश लॉकडाऊन केल्याने गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी मनरेगाअंतर्गत स्थानिक काम देण्याचे नियोजन केल्याचे गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे बीडीओ. रत्नाकर पगार, उपअभियंता वाघेरे,सरपंच सखाराम सहारे,ग्रामसेवक पवार, योगेश गांगुर्ड आदी उपस्थित होते. (२९ भोयेगाव)

Web Title:  Commencement of MNREGA work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक