मनमाड नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 01:31 AM2022-05-11T01:31:55+5:302022-05-11T01:32:34+5:30
नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला. त्यानुसार मनमाड नगरपरिषदेतही १० ते १४ मे दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. ही प्रक्रिया आज मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, मंगळवारी एकही हरकत व सूचना दाखल झाली नाही.
मनमाड : नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला. त्यानुसार मनमाड नगरपरिषदेतही १० ते १४ मे दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. ही प्रक्रिया आज मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, मंगळवारी एकही हरकत व सूचना दाखल झाली नाही. अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगातर्फे नगरपालिका निवडणुकीची यापूर्वी सुरू होऊन स्थगित झालेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १० ते १४ मे दरम्यान हरकती आणि सूचना दाखल करण्यात येणार आहेत. शनिवार १४ मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर प्राप्त हरकती व सूचनांवर सोमवार दि .२३ मे पर्यंत सुनावणी होणार आहे. ३० मे पर्यंत हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन तसा अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठविला जाईल. तर ७ जून रोजी अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी देण्यात येईल असा हा कार्यक्रम आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.---------------------------