साकूर येथील सदोबा महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 11:29 PM2022-02-12T23:29:09+5:302022-02-12T23:30:12+5:30
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील मुख्य ग्रामदैवत असलेल्या सदोबा महाराज यांच्या माघ शुद्ध नवमी व दशमीला कोरोनाच्या नियमांचे पालन करीत ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या (उरूस) यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. साकूर येथील प्रसिद्ध असलेला सदोबा महाराज यात्रोत्सव (उरूस) यावर्षी गेल्या पन्नास वर्षांच्या कालखंडानंतर भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत दर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी गावातून वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढत ग्रामस्थांनी मिरवणुकीत सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यानंतर मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गावात घरोघरी गोड-धोड पदार्थ बनविले होते. त्याचप्रमाणे पुरण-पोळीचा नैवद्य सदोबा महाराज यांना दाखविण्यात आला. त्याचप्रमाणे यात्रोत्सवानिमित्त गावामध्ये इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या सदोबा महाराज यात्रोत्सवाच्या दिवशी करण्यात आले होते. यात्रोत्सवाच्या मुख्य दिवशी ग्रामदैवत असलेल्या सदोबा महाराज यांच्या संदलची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे सुंदर असे नृत्य करणारे अश्व. परिसरातील अश्वप्रेमी आपले अश्व घेऊन सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या ठेक्यावर ठेका धरत या अश्वांची जुगलबंदीची रंगत पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
(१२ साकूर १)