ग्रामीण पोलिसांच्या लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:37+5:302021-02-07T04:14:37+5:30

ग्रामीण पोलीस दलाच्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मालेगावपासून इगतपुरीपर्यंत सर्वांनी कायदा, सुव्यवस्था सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यात ...

Commencement of rural police vaccination | ग्रामीण पोलिसांच्या लसीकरणास प्रारंभ

ग्रामीण पोलिसांच्या लसीकरणास प्रारंभ

Next

ग्रामीण पोलीस दलाच्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मालेगावपासून इगतपुरीपर्यंत सर्वांनी कायदा, सुव्यवस्था सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यात अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांनाही लस घेणे गरजेची बाब बनली होती. त्यामुळे सदर लस कधी येईल, याबाबत उत्कंठा ताणली गेली होती. अखेर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मविप्रच्या मेडिकल कॉलेज येथे प्रथम कोविड लस घेत याचा शुभारंभ केला तर त्यांच्या पाठोपाठ पहिल्या दिवशी सात अधिकारी व ६५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

कोट---

कोरोनाच्या काळात सेवा बजावत असताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. यात नऊ पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी गेला. त्यामुळे लस येणे हे गरजेचे झाले होते. जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यातील एकूण ३,७०० कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील २३ केंद्रांमधून टप्प्याटप्य्याने ती देण्यात येईल. कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे.

- सचिन पाटील,

पोलीस अधीक्षक

फोटो- ०६ पोलीस कोरोना

कोविड लस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ करताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील.

===Photopath===

060221\06nsk_43_06022021_13.jpg

===Caption===

फोटो- ०६ पोलिस कोरोना कोविड लस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ करताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील.

Web Title: Commencement of rural police vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.