लसीकरण केंद्राचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:02+5:302021-07-14T04:18:02+5:30
---- नाशिकरोड, बिटको महाविद्यालयात लोकसंख्या दिन नाशिकरोड : बिटको महाविद्यालयात लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी ...
----
नाशिकरोड, बिटको महाविद्यालयात लोकसंख्या दिन
नाशिकरोड : बिटको महाविद्यालयात लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. संजय तुपे म्हणाले, जास्त लोकसंख्येमुळे देशामध्ये अनेक समस्याही निर्माण होतात. जास्त लोकसंख्येच्या देशांमध्ये साधनसामग्रीचा वापर काटकसरीने करावा लागतो. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिलकुमार पाठारे, प्रा. लक्ष्मण शेंडगे, प्रा. नरेश पाटील, डॉ. अर्चना पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
---
पांडे विद्यालयाचा उपक्रम
नाशिकरोड : चेहेडी येथील एस. के. पांडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने खास पालक आणि विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि दिलेला स्वाध्याय तपासणी करण्यासाठी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमाची संकल्पना विद्यालयाच्या प्राचार्या बोराडे, तसेच संस्था प्रशासकीय अधिकारी संदीप पांडे यांची आहे. विद्यालयाच्या शिक्षिका ज्योत्स्ना बोरस्ते, विनोद पानसरे, विनोद व सहकारी परिश्रम घेत आहेत.
---
शिक्षकांकडून पालक भेटी
नाशिकरोड : पांडे विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मोकळ्या जागेत, मंदिराच्या आवारात, तसेच शेतात झाडाखाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करीत आहे. स्वाध्याय तपासून विद्यार्थ्यांना सूचना देत आहेत. नंतर विद्यार्थ्यांसोबत पालक भेट घेतली जाते व समस्यांबाबत चर्चा केली जाते. या उपक्रमाला पालकांनी चांगली पसंती दिली आहे. संस्थेच्या पदाधिकारी वर्गाने विद्यालयाचे कौतुक केले आहे.