सिडकोत शाही पॅलेस देखावा कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:26 AM2021-02-18T04:26:27+5:302021-02-18T04:26:27+5:30
शासनाच्या नियमावलीत मिरवणूक रद्द झाल्याने समितीच्या वतीने कोविडची दक्षता घेत सर्व कार्यक्रम एकाच ठिकाणी करण्यात येणार असून, शुक्रवारी सकाळी ...
शासनाच्या नियमावलीत मिरवणूक रद्द झाल्याने समितीच्या वतीने कोविडची दक्षता घेत सर्व कार्यक्रम एकाच ठिकाणी करण्यात येणार असून, शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून दिवसभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. याठिकाणी दिवसभर आदिवासी नृत्य, एलईडी स्क्रीनच्या आधारे शिवरायांच्या जन्मापासून राजभिषेक, गडकिल्ले यासह सर्व माहिती ऑनलाईन दाखविण्यात येणार आहे. तसेच विविध शाळांमधून शिवरायांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाही पॅलेससह संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने फुलवणार असल्याची माहिती अध्यक्ष पवन मटाले व हर्षदा सोनवणे यांनी सांगितले.
यावेळी म वि प्र संचालक नाना महाले, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, रिपाई जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, विलास शिंदे, जगन पाटील, अंकुश पवार, तानाजी जायभावे आदी उपस्थित होते.
(फोटो १७ सिडको)- शिवजयंतीनिमित्त शाही पॅलेस देखाव्याचा शुभारंभ करताना बबन घोलप, विजय करंजकर, नाना महाले, सुधाकर बडगुजर, प्रकाश लोंढे, शरद आहेर आदी.