महापालिकेच्या साडेतीनशे कोटी रूपयांच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:05+5:302021-03-10T04:16:05+5:30
सव्वा दोनशे कोटी रूपयांची रस्त्याची कामे आणि त्याचबरोबर १६ जलकुंभाचे भूमिपूजन माजी मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्या ...
सव्वा दोनशे कोटी रूपयांची रस्त्याची कामे आणि त्याचबरोबर १६ जलकुंभाचे
भूमिपूजन माजी मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत
करण्यात आले. आगामी काळात आणखी साडेपाचशे कोटी रूपयांच्या कामांचे
भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे होणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी
यांनी दिली तर शहरात केलेली विकास कामे हेच भाजपाचे पाठबळ असून त्याच
मुद्यावर निवडणूक लढवण्यात येणार असल्याची घोषणाही महाजन यांनी केली.
शहरातील विविध सहा विभागांमध्ये रस्ते आणि जलकुंभांचे भूमिपूजन शनिवारी
करण्यात आले. यातील शहराला मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या सोळा जलकुंभांचे
भूमिपूजन भाजपाचे मुख्यालय असलेल्या वसंत स्मृती येथून करण्यात आले.
यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, ॲड.
राहुल आहेर तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप,उपमहापौर भिकुबाई बागुल,भाजपा
शहराध्यक्ष गिरीश पालवे, पक्षाचे नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, स्थायी
समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील
आदी उपस्थित हाेते. शहरातील रस्ते कामांचे भूमिपूजन सातपूर विभागात अशोक
नगर, सिडकोत त्रिमूर्ती चौक, पूर्व विभागात इंदिरानगर येथील रथचक्र चौक,
नाशिकरोड विभागात दत्त मंदिर, पंचवटीत वज्रेश्वरी नगर झोपडपट्टी येथे
करण्यात आले. सातपूर येथील कार्यक्रमास शशी जाधव, वर्षा भालेराव, हेमलता
कांडेकर, पल्लवी पाटील, सिडकोत अलकाताई अहेर, जगन्नाथ पाटील, छाया
देवांग, पूर्व विभागात शाहीन मिर्झा, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे,
दीपाली कुलकर्णी, तर नाशिकरोड येथे संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे,
दिनकर आढाव, संगीता गायकवाड, प्रा. शरद मोरे, तर पंचवटीत माने, धनगर,
शेट्टी आदी उपस्थित होते.
===Photopath===
090321\09nsk_46_09032021_13.jpg
===Caption===
महापालिकेच्या साडे तीनशे कोटी रूपयांच्या कामाचा शुभारंभ