शेतकरी मेळाव्यात राज्य शासनावर टीका

By admin | Published: August 7, 2016 11:59 PM2016-08-07T23:59:22+5:302016-08-07T23:59:55+5:30

अनिल कदम : पीक कर्जाबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा बँकेवर मोर्चा

Commentary on the State Government in Farmer's Meet | शेतकरी मेळाव्यात राज्य शासनावर टीका

शेतकरी मेळाव्यात राज्य शासनावर टीका

Next

निफाड : पीककर्ज वितरणाबाबत जिल्हा बँकेने मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास बुधवारी जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार अनिल कदम यांनी निफाड येथे दिला.
नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देणे एक महिन्यापासून बंद केले आहे़ त्यामुळे पुरेसा पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पीक संगोपनासाठी पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या व्यथा आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात आमदार कदम अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
नाबार्ड, जिल्हा बँक, विकास सेवा संस्था अशा त्रिसूत्रीने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होतो. अधिवेशनात नाबार्डने जिल्हा बँकेला कर्ज वितरणासंर्दभात कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे जिल्हा बँक उद्दिष्टांच्या पुढे कर्जपुरवठा करण्यास हतबल झाली आहे. नियमित व पूर्ण कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे बंद झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडकळीस आला आहे. कर्ज वितरणाबाबत मंगळवारपर्यंत जिल्हा बँकेने निर्णय न घेतल्यास बुधवारी शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार कदम यांनी मेळाव्याप्रसंगी दिला.
याप्रसंगी व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुभाष कराड, संचालक राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, बाळासाहेब क्षीरसागर, पिंपळगाव बाजर समितीचे संचालक भास्करराव बनकर, चिंतामण सोनवणे, रमेशचंद्र घुगे, संपतराव डुंबरे, भगीरथ शिंदे, शंकरराव कोल्हे, तुकाराम सातभाई, रामकृष्ण दराडे, शिवाजी तासकर, एस. आर. शिंदे, जानकीराम धारराव आदि मान्यवर उपस्थित
होते.
प्रास्ताविकात राजेंद्र डोखळे यांनी आता गोड वाटणारी नियमनमुक्ती कडवट असल्याचे भविष्यात जाणवेल, अशी भीती व्यक्त केली. यावेळी भास्करराव बनकर, पंढरीनाथ थोरे यांनी सरकारच्या नियमनमुक्तीवर टीका केली. शेतकऱ्यांच्या वतीने जानकीराम धारराव, भीमराव काळे, भगीरथ शिंदे, एस. आर. शिंदे यांनीही भाजपा सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. (वार्ताहर)

Web Title: Commentary on the State Government in Farmer's Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.