व्यापारी भवनाच्या बांधकामाचे नियोजनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:45 PM2018-09-30T18:45:44+5:302018-09-30T18:46:16+5:30

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापतींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मागील सभेचे इतिवृत्त, आर्थिक पत्रके व वार्षिक अहवाल वाचून दाखविण्यात आला. यावर साधक-बाधक चर्चा होऊन उत्पन्न-खर्चास मंजुरी देण्यात आली.

 Commercial Building Planning | व्यापारी भवनाच्या बांधकामाचे नियोजनं

व्यापारी भवनाच्या बांधकामाचे नियोजनं

Next
ठळक मुद्दे भविष्यात शेतकऱ्यांसाठी माती व पाणी परीक्षण लॅब, कृषी ग्रंथालय, शेतकरी प्रशिक्षण केंद्र तसेच शेतकºयांना कृषीविषयक व बाजारभावाची माहिती उपलब्ध होण्यासाठी बाजार समितीमार्फत सोशल मीडियाद्वारे दैनंदिन माहिती पुरविण्यात येते. बाजार घटकांसाठी मुख्य बाजार आवारात


चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापतींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मागील सभेचे इतिवृत्त, आर्थिक पत्रके व वार्षिक अहवाल वाचून दाखविण्यात आला. यावर साधक-बाधक चर्चा होऊन उत्पन्न-खर्चास मंजुरी देण्यात आली.
यानंतर बाजार समितीस भविष्यात करावयाच्या विकासकामांची माहिती देण्यात आली.
उपबाजार आवार वडनेरभैरव येथे नियमित भाजीपाला लिलाव, तार कम्पाउण्ड करणे व स्वच्छतागृह बांधणे, शीतगृह बांधणे, बेदाणा लिलाव सुरू करणे, तर उपबाजार आवार वडाळीभोई येथे नियमित भुसार शेतमाल लिलाव सुरू करणे, संपूर्ण वॉल कम्पाउण्ड व स्वच्छतागृह बांधकाम करणे, शेतीपूरक व्यवसायासाठी नवीन व्यापारी संकुल बांधणे, रायपूर येथे टमाटा लिलाव शेड, आवारात तार कम्पाउण्ड करणे व तात्पुरते स्वच्छतागृह बांधणे, हंगामात कांदा व भुसार लिलाव सुरू करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती संचालक मंडळाने यावेळी दिली.
उपस्थित शेतकरी, व्यापारी, कामगार व समितीचे इतर घटक/प्रतिनिधी यांनी मांडलेल्या समस्या व सूचना विचारात घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन मंडळातर्फे देण्यात आले.
यावेळी उपसभापती नितीन अहेर, संचालक पंढरीनाथ खताळ, संपतराव वक्टे, निवृत्ती घुले, अण्णासाहेब अहेर, विलास ढोमसे, विक्र म मार्कंड, संजय जाधव, राजेश वानखेडे, चंद्रकांत व्यवहारे, प्रवीण हेडा, सुरेश जाधव, सरस्वती शिंदे, कलावती गुंजाळ, प्रभारी सचिव जे. डी. अहेर, बी. बी. वाघ, पारस डुंगरवाल, शिवाजी कासव, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन गुंजाळ, व्यापारी भिकन अग्रवाल, राजेंद्र व्यवहारे, गौरव
हेडा तसेच समिती कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती व विकास सोसायटीचे प्रतिनिधी, व्यापारी व माथाडी कामगार प्रतिनिधी, बाजार
समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. समितीचे उपसभापती नितीन अहेर यांनी आभार मानले.

Web Title:  Commercial Building Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.