महागाईचा तडका! जिभेचे लाड थांबवा; हॉटेलचे मेन्यू कार्ड आता गॅसवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:11 PM2021-12-09T18:11:41+5:302021-12-09T18:13:57+5:30

नाशिक - एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला पुन्हा एकदा झटका बसला असून १ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महाग ...

Commercial LPG gas cylinder price hiked by Rs 100 | महागाईचा तडका! जिभेचे लाड थांबवा; हॉटेलचे मेन्यू कार्ड आता गॅसवर

महागाईचा तडका! जिभेचे लाड थांबवा; हॉटेलचे मेन्यू कार्ड आता गॅसवर

googlenewsNext

नाशिक - एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला पुन्हा एकदा झटका बसला असून १ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली असून गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

व्यावसायिक गॅस सिलंडरचे दर

जानेवारी १३४४.५२

फेब्रुवारी -१५५६

मार्च १६४१.६७

एप्रिल - १६७०.२५

मे - १६७०.२५

जून- १६७०.२५

जुलै - १५८२.३५

ऑगस्ट -१६५३.२

सप्टेंबर -१७३२

ऑक्टोबर -१७६७.२

नोव्हेंबर - २०५३

१३०० चा सिलिंडर २ हजार १५३ वर पोहचला

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती गेल्या डिसेंबर २०२० मध्ये साधारणपणे १३०० रुपयांपर्यंत होत्या. परंतु , या सिलिंडरच्या किमतीत एका वर्षात तब्बल आठशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

कोरोना अन् महागाई

कोरोना काळात हॉटेल व्यावसायिकांना कोरोनामुळे आधीपासूनच विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अजूनही व्यावसाय पूर्णपणे सावरू शकलेला नसल्याने व्यावसायिक गॅस सिलिंडर सोबतच अन्य किराणा मालही महागला आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या समोरील अडचणी वाढतच आहे.

धनंजय जाधव, हॉटेल व्यावसायिक

व्यावसायिक गॅस सिलिंडर सोबतच अन्य किराणा मालही महागला असताना हॉटेल चालकांना खाद्य पदार्थ्यांच्या किमतीत ग्राहक दुरावण्याच्या भीतीने वाढ करणे शक्य होत नाही. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ केली तर ग्राहकच मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे.

- समाधान काळे, हॉटेल व्यावसायिक

घरगुती सिलिंडरची सबसिडी नावालच

केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी बंद करून ती रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केल होती. परंतु, जवळपास मार्च २०२०पासून नाशिककर ग्राहकांच्या खात्यावर सबसिडीच जमा झालेली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत केंद्र सरकारची घरगुती सिलिंडरची सबसिडी केवळ नावापुरतीच उरली असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांमध्ये उमटत आहे.

घरगुती सिलिंडरचे दर (ग्राफ)

जानेवारी - ६९७.५०

फेब्रुवारी - ७७२.५०

मार्च - ८२२.५०

एप्रिल - ८१२.५०

एप्रिल - ८१२.५०

मे - ८१२.५०

जून - ८१२.५०

जुलै - ८३८

ऑगस्ट -८६३

सप्टेंबर - ८८८

ऑक्टोबर -९०३

नोव्हेंबर -९०३

Web Title: Commercial LPG gas cylinder price hiked by Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.