निवासी वापराच्या जागेवर व्यावसायिक गाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:52+5:302021-04-07T04:15:52+5:30

ब्राह्मणगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव व आशा प्रकाश आहेर यांच्या लखमापूर येथील ग.नं. ४५९ /१ २ ही ...

Commercial spaces on residential use space! | निवासी वापराच्या जागेवर व्यावसायिक गाळे!

निवासी वापराच्या जागेवर व्यावसायिक गाळे!

Next

ब्राह्मणगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव व आशा प्रकाश आहेर यांच्या लखमापूर येथील ग.नं. ४५९ /१ २ ही शेतजमीन बिनशेती होण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी, कळवण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदरच्या मिळकतीचा अभिन्यास तयार होऊन त्या अनुषंगाने नगररचना विभागाकडे काही अटी व शर्तीवर अभिन्यासास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कळवण यांनी त्यांच्याकडील एसआर /नं./बि.शे.प. क्र.२६/१९९७, दि. २३/१२/१९९८ प्रमाणे निवासी बिनशेतीची परवानगी देण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला होता. त्यानंतर लखमापूर येथील विद्या गांगुर्डे, निर्मला देवरे, जयश्री जैन, वैशाली पवार, साहेबराव चव्हाण, तुकाराम पाचोरे, शशिकांत बिल्लाडे यांना विक्री करण्यात आले होते.

सदरच्या अभिन्यासाच्या पूर्वेस असलेला निंबोळा - लखमापूर या राज्य महामार्गालगत असलेल्या क्षेत्रावर अतिक्रमण करून रस्त्यालगत असलेल्या मोठमोठी सुपारी, नारळ, आंबा, निमोनी, चंदन, बदाम, चिकू अशी झाडे प्लॉटधारकांनी लागवड केलेली आहेत. आता अभिन्यासाप्रमाणे पूर्वीच्या जमीनमालक यांचा दुरान्वये संबंध नसताना अभिन्यासातील दर्शविलेल्या १३९.०६ मी. या रस्त्यावर तसेच राज्य मार्गावर अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या जेसीबीच्या साहाय्याने झाडे तोडून व्यापारी गाळे उभारून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

वास्तविक अशाप्रकारे निवास म्हणून अभिन्यास मंजूर असताना अतिक्रमण करून वाणिज्य वापर पूर्वपरवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महसूल विभागाने तत्काळ संबंधितांवर कारवाई करून केले जाणारे अतिक्रमण काढावे अन्यथा आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा प्लॉटधारकांनी दिला आहे.

Web Title: Commercial spaces on residential use space!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.