कमीशन बारा रूपये, खर्च ५१ रूपये ! रेशन दुकानदारांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:17 PM2017-11-06T19:17:09+5:302017-11-06T19:17:37+5:30

Commission twelve rupees, cost 51 rupees! Ration Shoppers' Soreness | कमीशन बारा रूपये, खर्च ५१ रूपये ! रेशन दुकानदारांची व्यथा

कमीशन बारा रूपये, खर्च ५१ रूपये ! रेशन दुकानदारांची व्यथा

googlenewsNext

नाशिक : फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रती कार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलो पर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणा-या  दुकानदारांना मात्र चलन भरतांना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदारांच्या या आर्थिक व्यथेशी कोणतेही सोयरसुतक नसलेले पुरवठा खाते मात्र साखर न उचलणाºया दुकानदारांना नोटीसा पाठवून मानसिक छळ करीत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रती कार्ड एक किलो साखर देण्यात येत असल्यामुळे अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पाहता प्रत्येक रेशन दुकानदारास चार ते चाळीस किलो या प्रमाणातच दरमहिन्याला साखरेचा कोटा दिला जातो. या साखरेसाठी दुकानदाराने साखरेवर मिळणारे कमीशनची रक्कम वजा जाता उर्वरित रकमेचे चलन म्हणजेच बॅँकेत पैसे जाऊन पैसे भरावे लागतात. सध्या रेशनवर मिळणा-या साखरेचा दर २० रूपये किलो इतका असून, त्याच्या विक्रीतून दुकानदारास एका किलोमागे दिड रूपये कमिशन मिळते. म्हणजे एका दुकानदाराला जर चार किलोच साखरेचा कोटा मंजुर असेल तर त्याने सहा रूपये कमिशनचे वजा करून ५४ रूपये चलनाद्वारे भरणे अपेक्षित आहे. परंतु ज्या राष्टयकृत बॅँकेत रेशन दुकानदारांना चलन भरावे लागते त्यात कमीत कमी ३०१ रूपयांचे चलन भरावे लागते. राष्टÑीयकृत बॅँका तीनशे रूपयांच्या आतील रक्कम चलनाद्वारे भरून घेत नाही. त्यामुळे दुकानदाराला तीनशे रूपयांहून अधिक रक्कम बॅँकेत चलनाद्वारे भरली तरच पुरवठा खाते त्यांना परमीट अदा करते ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच रेशन दुकानदाराला चार किलो साखरेच्या सहा रूपये कमिशनसाठी तीनशे रूपयांचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे बºयाचशा दुकानदारांना हा घाट्याचा व्यवसाय वाटू लागला असून, ज्यांना चार ते वीस किलो पर्यंत दरमहा साखर मिळते व ज्यांना तीनशे रूपयांच्या आत कमीशनची रक्कम मिळणार आहे अशा दुकानदारांना घरातून रक्कम भरून अंत्योदयच्या लाभार्थ्यांना साखर वाटप करावी लागत आहे. त्यामुाळे गेल्या तीन महिन्यांपासून दुकानदार नाखुषीने साखरेची उचल करीत असून, काहींनी याच कारणास्तव साखर न उचलल्याने पुरवठा खात्याने त्यांना नोटीसा पाठवून फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Commission twelve rupees, cost 51 rupees! Ration Shoppers' Soreness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.