आयुक्तांनी सभागृहाला सुनावले खडे बोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:59 AM2018-04-01T01:59:47+5:302018-04-01T01:59:47+5:30

अधिकाऱ्यांना धमक्या देऊन कामे होणार नाहीत. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. करवाढ सुधारणेसारखे कटू निर्णय घ्यावे लागतील. एकांगी विचार करून चालणार नाही. एकमेकांना शिव्या देऊन पर्याय निघणार नाहीत. तुमची परिस्थिती अवघड आहे म्हणून मी बोलतो आहे. लोकांना मला शिव्या देऊ द्या. तुमची मानसिकता बदला. तुम्हाला सवयी मोडाव्या लागतील, अन्यथा विकास अशक्य आहे,

The Commissioner has told the auditorium! | आयुक्तांनी सभागृहाला सुनावले खडे बोल !

आयुक्तांनी सभागृहाला सुनावले खडे बोल !

Next
ठळक मुद्देएकमेकांना शिव्या देऊन पर्याय निघणार नाहीत. तुमची परिस्थिती अवघड आहे तुम्हाला सवयी मोडाव्या लागतील, अन्यथा विकास अशक्य आहे, पावणेदोन तास भाषण करत सभागृहातील सदस्यांचे कान उपटले.

नाशिक : अधिकाऱ्यांना धमक्या देऊन कामे होणार नाहीत. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. करवाढ सुधारणेसारखे कटू निर्णय घ्यावे लागतील. एकांगी विचार करून चालणार नाही. एकमेकांना शिव्या देऊन पर्याय निघणार नाहीत. तुमची परिस्थिती अवघड आहे म्हणून मी बोलतो आहे. लोकांना मला शिव्या देऊ द्या. तुमची मानसिकता बदला. तुम्हाला सवयी मोडाव्या लागतील, अन्यथा विकास अशक्य आहे, अशा शब्दांत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.३१) झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय महासभेत सभागृहाला खडे बोल सुनावले.  महापालिकेच्या मागच्या सभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापौरांनी बोलू दिले नव्हते. परंतु, शनिवारी झालेल्या अंदाजपत्रकीय सभेत तुकाराम मुंढे यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी तब्बल पावणेदोन तास भाषण करत सभागृहातील सदस्यांचे कान उपटले. सदस्यांना त्यांच्या जबाबदाºया आणि प्राधान्यक्रम कशाला द्यावा, याचेही भान त्यांनी आणून देण्याचा प्रयत्न केला. मुंढे यांनी सांगितले, आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ३३१ कोटींची वाढ प्रस्तावित केली, त्याबद्दल एकानेही भाष्य केले नाही. आमची कामे बंद पाडली, हाच सर्वांचा सूर होता. सभागृहात ज्याप्रकारे चर्चा झाली ती एकांगी होती. अंदाजपत्रकात त्रुटी असल्याचे काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. परंतु, अंदाजपत्रकात एकही त्रुटी नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यावरही त्रुटी आढळून आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंदाजपत्रकात नावीन्य काहीच नसल्याचे सदस्यांनी म्हटले परंतु, नवीन काय आहे हे आपण सिद्ध करून दाखवू, असे आव्हानही मुंढे यांनी सभागृहाला दिले. पुढच्या दोन वर्षांत आपण अडथळामुक्त शहर करून दाखवू शिवाय, २४ तास पाणीपुरवठाही करून दाखवू असे आश्वासन दिले. नागरिकांना सेवा पुरविणे गरजेचे आहे. केवळ ब्लेमगेम करून प्रश्न सुटणार नाही. मी विकास खुंटवला अशी भावना समोर आणली गेली आहे परंतु, सर्वांना न्याय देण्याची माझी भूमिका आहे. उत्पन्न वाढवावे लागणार आहे. टॉप टू बॉटम सुधारणा करावी लागणार आहे. अनुदानासाठी प्रत्येक वेळी शासनाकडे बोट दाखवून चालणार नाही. एलबीटीचे रिटर्न व्यापाºयांनी चुकीचे सादर केले असतील तर त्यांना नोटिसा बजावू नको तर काय करू, असा सवालही त्यांनी केला. शाश्वत विकासावर कुणीच बोलत नाही. मी एका ठिकाणी तडजोड केली तर शंभर ठिकाणी ती करावी लागेल. त्यात मी मदत करू शकणार नाही, असेही आयुक्तांनी ठणकावून सांगितले.
मांजराच्या गळ्यात सर्व मिळून घंटा बांधू
चुकीचे काम करणाºयांना शिक्षा झालीच पाहिजे. मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची? असा प्रश्न आहे. परंतु, मांजराच्या गळ्यात आपण सर्व मिळून घंटा बांधू. त्यासाठी मला सभागृहाची साथ लागेल. तुम्ही एखादा विषय नाकारला तर मी तो विखंडनासाठी शासनाकडे पाठवत वेळ वाया घालवणार नाही. मला रस्त्यांपेक्षा अडथळामुक्त शहराला जास्त पैसा द्यायचा आहे. अभ्यासिका मनपानेच का चालवू नये, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बिनबुडाचे आरोप नको
सभेत काही सदस्यांनी अधिकाºयांवर आरोप केले. त्यावर बोलताना आयुक्त म्हणाले, अधिकाºयांवर आरोप करताना तसे पुरावेही द्या. कोणी चूक करत असेल तर कारवाई करू. परंतु, बिनबुडाचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. टाळी एका हाताने वाजत नाही. कुणाला लक्ष्य करणे चुकीचे आहे. ज्यांनी कुणी अधिकाºयांबद्दल चुकीचे शब्दप्रयोग केले असतील ते मागे घ्यावेत, असेही निर्देश त्यांनी महापौरांना दिले. त्यानुसार, महापौरांनी सदर शब्दप्रयोग इतिवृत्तातून काढून टाकण्याचे आदेश दिले.

Web Title: The Commissioner has told the auditorium!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.