मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाणीपुरवठ्याबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:34 AM2018-07-25T00:34:12+5:302018-07-25T00:34:26+5:30
प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने दखल घ्यावी यासाठी आमदार देवयानी फरांदे, प्रभागाचे नगरसेवक यांनी तातडीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्र दिले.
इंदिरानगर : प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने दखल घ्यावी यासाठी आमदार देवयानी फरांदे, प्रभागाचे नगरसेवक यांनी तातडीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्र दिले. गेल्या वर्षापासून इंदिरानगर, राजीवनगर, कलानगर, संताजीनगर, श्रद्धाविहार कॉलनी, श्रद्धा गार्डन, शिव कॉलनी, पांडवनगरी, एकता कॉलनी, रॉयल गार्डन, सार्थकनगर यासह परिसरात पाण्याची गंभीर झाली आहे. परिसरातील पाणी प्रश्नामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. होळीच्या दिवशी प्रभागाच्या नगरसेवकासह सुमारे दीडशे महिलांनी राजे छत्रपती चौकात पाणीपुरवठा अधिका-यांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. त्यावेळी अधिकाºयांनी पाणी पूर्ण सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले होते तरी अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’च असून, तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पत्र आयुक्त तुकाराम मुढे यांना समक्ष भेटून प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अॅड. श्याम बडदे यांनी दिले आहे.