करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:59 AM2018-04-29T00:59:32+5:302018-04-29T00:59:32+5:30

‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरांना देत करवाढीबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले.

The commissioner on tax increase; Apply taxation tax | करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या

करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या

Next

नाशिक : ‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरांना देत करवाढीबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उपक्रमात २७ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी काही तक्रारींची दखल घेत निराकरणाचे आश्वासन दिले तर काही तक्रारदारांचे दात त्यांच्याच घशात घालत घाम फोडण्याचेही काम चोखपणे बजावले.  गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ६ ते ६.३० या वेळेत तक्रारदार नागरिकांना टोकन क्रमांकाचे वाटप झाल्यानंतर आयुक्तांनी मैदानावर उभारलेल्या छोटेखानी व्यासपीठावरून एकेक तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली. मागील शनिवारी (दि.२१) झालेल्या उपक्रमात ७१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर शनिवारी (दि.२८) २७ तक्रारदारांनी आपली गाहाणी आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. त्यामधील काही तक्रारींसंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकारीवर्गाला दिले तर काही तक्रारदारांना उलट सवाल करत नागरिकांच्या कर्तव्याचेही भान आणून देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी, करवाढीचा मुद्दाही समोर आला असता आयुक्तांनी त्यावर आपली मते मांडताना सांगितले, नाशिकमध्ये मिळकत कराचे उत्पन्न हे अवघे ८२ कोटी रुपये आहे.
सदस्यांच्या प्रॉपर्टी आहेत काय ?
डिसूझा कॉलनीतील टेनिस कोर्टजवळ हॉकर्स झोन निश्चित करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार एका विक्रेत्याने केली. त्यावर, आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, विभागीय अधिकाºयांनी त्या प्रभागातील सदस्य व परिसरातील रहिवाशांचा विरोध असल्याचे सांगितले. त्यावेळी, आयुक्तांनी त्याठिकाणी सदस्यांच्या प्रॉपर्टी आहेत काय? असा सवाल करत त्याला महासभेनेच मान्यता दिलेली असल्याने हॉकर्स झोनची त्वरेने अंमलबजावणीचे आदेश दिले.
काय म्हणाले आयुक्त ?
महापालिकेत मनुष्यबळ अजिबात कमी नाही.  पुढच्या वर्षापासून घरपट्टीची आॅनलाइन बिले मिळणार.  एक एकरपेक्षा मोठ्या उद्यानांच्या ठिकाणी विरंगुळा केंद्र उभारणार.  मनपाच्या मोकळ्या भूखंडांवर यापुढे कोणतेही बांधकाम नाही.  ई-एनएमसी कनेक्ट अ‍ॅपवर आतापर्यंत ४,९०० तक्रारी.
संपूर्ण भारतात नाशिकमध्ये सर्वाधिक ग्रीन जीम.  जॉगिंग ट्रॅकवर पेव्हर ब्लॉक बसविणार.  प्लॅस्टिकबंदी अगोदर स्वत:पासूनच करा.  बंद पाणी मीटरबाबत पेनल्टी लावणार. जास्त पाणी वापरानुसार दर आकारणी.

Web Title: The commissioner on tax increase; Apply taxation tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.