आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:07 AM2018-04-26T01:07:40+5:302018-04-26T01:07:40+5:30
शहरातील मिळकत करवाढीमुळे वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर गेले असून, त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे असणार आहे. ते गुरुवारी (दि. २६) या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
नाशिक : शहरातील मिळकत करवाढीमुळे वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर गेले असून, त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे असणार आहे. ते गुरुवारी (दि. २६) या पदाचा कार्यभार स्वीकारतील. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्तिगत कारणामुळे तसेच विदेश दौऱ्यामुळे ही रजा घेतली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयास पाच दिवसांपूर्वीच कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यभार स्वीकारणार आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरातील करवाढीचा विषय गाजत आहे. आधी सर्व मिळकतींची करवाढ करण्यात आल्यानंतर आयुक्तांनी जमिनींचे करमूल्य निर्धारित करण्याची अधिसूचना काढली होती. त्यावरून शहरात प्रचंड गोंधळ आणि उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण महापालिका हद्दीवरच कर लावण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला आणि त्यानुसार मिळकती आणि भूखंडावर करवाढ केली. मोकळ्या भूखंडांमध्ये शेतीक्षेत्राचा समावेश असल्याने शेतकºयांनी त्याविरोधात मेळावे घेऊन विरोध सुरू केला. आयुक्तांनी बॅकफुटवर येत हरित क्षेत्रातील शेतीवर कर नसल्याचा दावा करतानाच करमूल्यातही पन्नास टक्के कपात केल्याची घोषणा केली. परंतु आता रहिवासी क्षेत्रातच मोठ्या प्रमाणात शेती असल्याने शेतकºयांमधील नाराजी कायम होती. राजकीय पक्षांना ही धग सहन करणे शक्य नसल्याने तेही रस्त्यावर उतरले होते.
चर्चा आणि संभ्रम
आयुक्त मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर जात असल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कार्यभार स्वीकारण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश. मुंढे यांनी व्यक्तिगत कारणामुळे तसेच विदेश दौºयामुळे ही रजा घेतली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयास पाच दिवसांपूर्वीच कळविले होते.
उलटसुलट चर्चेला उधाण
गेल्या २३ तारखेला सत्तारूढ भाजपाने विशेष महासभा बोलावून करवाढ स्थगित करण्याचा ठराव केला. याचवेळी महापालिकेबाहेर प्रचंड आंदोलन करण्यात आले. आयुक्तांचा निर्णय हा आचारसंहिता कालावधीत असल्याने अखेरीस त्याबाबत तक्रार करण्याचे ठरविण्यात आल्याने त्यावरून आणखीनच कायदेशीर गोंधळ निर्माण झाला. नेमके याच दरम्यान आयुक्त मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर जात असल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.