आयुक्तांचा दणका! चार आदिवासी आश्रम शाळांची मान्यता रद्द

By श्याम बागुल | Published: June 3, 2023 04:25 PM2023-06-03T16:25:30+5:302023-06-03T16:25:49+5:30

एकाच दिवशी तीन आश्रम शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्रम शाळा चालकांचे धाबे दणाणले आहे. 

Commissioner's bump! Accreditation of four tribal ashram schools cancelled | आयुक्तांचा दणका! चार आदिवासी आश्रम शाळांची मान्यता रद्द

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext


नाशिक : आदिवासी आश्रम शाळांमध्ये गैरप्रकार व विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यास कुचराई करून अनुदान लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखविण्याच्या प्रकाराची आदिवासी आयुक्तांनी गंभीर दखल घेत तीन अनुदानित आश्रम शाळांची मान्यता रद्द केली आहे. एकाच दिवशी तीन आश्रम शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्रम शाळा चालकांचे धाबे दणाणले आहे. 

मान्यता रद्द करण्यात आलेल्या आश्रम शाळांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील शिवाजी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड जिल्ह्यातील कैलासनगर येथील जनता शिक्षण संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा भोसी, ता. किनवट व गडचिरोली जिल्ह्यातील राणी दुर्गावती आदिवासी विकास संस्था संचलित अरततोंडी व परसवाडी या संस्थांचा समावेश आहे. 

या तिन्ही संस्थांना आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून त्याची सुनावणी घेतली होती. त्यात समाधानकारक खुलासा न दिल्याने संस्थांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभारी आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी दिली.

Web Title: Commissioner's bump! Accreditation of four tribal ashram schools cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.