आयुक्तांचे ‘आॅपरेशन पाणीपुरवठा’ पाहणी : बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्राच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:35 AM2018-05-09T01:35:04+5:302018-05-09T01:35:04+5:30

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि. ८) ‘आॅपरेशन पाणीपुरवठा’ राबवत जलशुद्धिकरण केंद्रांसह काही जलकुंभांची पाहणी केली.

Commissioner's 'Operation Water Supply' Survey: Proposal for modernization of the 12 Bungalow Water Purification Center | आयुक्तांचे ‘आॅपरेशन पाणीपुरवठा’ पाहणी : बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्राच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव

आयुक्तांचे ‘आॅपरेशन पाणीपुरवठा’ पाहणी : बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्राच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव

Next
ठळक मुद्देआधुनिकी-करणासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जलकुंभ, पम्प हे स्वच्छ करण्याचे वर्षाचे वेळापत्रक

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि. ८) ‘आॅपरेशन पाणीपुरवठा’ राबवत जलशुद्धिकरण केंद्रांसह काही जलकुंभांची पाहणी केली आणि कामात कुचराई करणाऱ्या मक्तेदारांसह अधिकारी-कर्मचारी वर्गाला आपल्या धडक कार्यपद्धतीचा हिसका दाखविला. दरम्यान, गावठाण भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने बारा बंगला जलशुद्धिकरणाच्या आधुनिकी-करणासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना दिले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सकाळी बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रापासून पाहणी दौºयास सुरुवात केली. यावेळी आयुक्तांना आवारात पालापाचोळा, कचºयाचे दर्शन झाले. त्याबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचाºयांना जाब विचारला आणि तीन दिवसात परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे भूस्तर जलकुंभाची आयुक्तांनी स्वत: त्यामध्ये उतरून पाहणी केली व जलकुंभाच्या आवारातील प्रत्येक इमारत, जलकुंभ, पम्प हे स्वच्छ करण्याचे वर्षाचे वेळापत्रक तयार करण्याचे आदेशित केले. शहरातील गावठाण भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रातून होणार आहे. चोवीस तास पाणीपुरवठा करताना पाण्याची शुद्धता असणे व आवश्यक त्या दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य उंचीचा जलकुंभ असणे आवश्यक आहे. मात्र, बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रात एरीएशन फाउंटन नाही तसेच क्लोरिनेशन सिस्टीम जुन्या पद्धतीची असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यासाठी बारा बंगला येथे एरीएशन फाउंटन घ्यावे, तसेच जलशुद्धिकरण केंद्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी आॅटोमेशनची सर्व कामे व योग्य त्या उंचीचा जलकुंभ बांधणे, फिल्टर हाउसमधील वाया जाणाºया बॅकवॉशचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा उभारणे आदी कामांची तातडीने प्राकलने करून ती कामे स्मार्ट सिटीमधून करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. आयुक्तांनी तिडके कॉलनीत सुरू असलेल्या जलकुंभाचीही पाहणी केली. यावेळी तेथील कॉँक्रीटमध्ये वापरण्यात येणाºया खडी व वाळूची तपासणी केली असता, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना समाधानकारक उत्तर देत आले नाही.
जलकुंभामध्ये उतरून पाहणी
बारा बंगला जलशुद्धिकरण केंद्रातील भूस्तर जलकुंभाची आयुक्तांनी स्वत: त्यामध्ये उतरून पाहणी केली व दुुरुस्तीच्या सूचना केल्या. प्रत्येक टाक्यांची स्वच्छता वेळच्या वेळी झाली पाहिजे, अशी ताकीदही त्यांनी अधिकाºयांना दिली. जलशुद्धिकरण केंद्राच्या आवारात असलेले डेब्रीज उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेशित केले. याशिवाय केंद्राच्या युनिटनिहाय इनलेट चेंबरपासून ते क्लोरिनेशन युनिटपर्यंत सविस्तर बारकाईने पाहणी केली.

Web Title: Commissioner's 'Operation Water Supply' Survey: Proposal for modernization of the 12 Bungalow Water Purification Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी