आयोगाने मागविली मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:50 AM2018-11-18T00:50:12+5:302018-11-18T00:50:31+5:30
लोकसभा निवडणुकीचे बिगुल फेब्रुवारीच्या अखेरीस वाजण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाºया तयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदान केंद्रांची माहिती व त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांची संख्या तसेच या कर्मचाºयांनी उपलब्धता कशी होईल याची माहिती तातडीने मागविली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीचे बिगुल फेब्रुवारीच्या अखेरीस वाजण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाºया तयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदान केंद्रांची माहिती व त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांची संख्या तसेच या कर्मचाºयांनी उपलब्धता कशी होईल याची माहिती तातडीने मागविली आहे.
निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार कोणत्याही निवडणुकीपूर्वी किमान ९० दिवस अगोदर तयारी होणे अपेक्षित असल्याने निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सक्तीच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मतदारांची संख्या लक्षात घेता सध्या ४४४६ इतकी मतदान केंद्रे असून, त्यात दोन लाख ११ हजार मतदारांची नव्याने भर पडणार आहे. त्यामुळे वाढीव मतदारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात सहायकारी मतदान केंद्रे तयार करण्यात येणार असून, त्याची संख्या दीडशेच्या घरात असेल. लोकसभा निवडणुकीसाठी ही मतदान केंद्रे सहायकारी म्हणून राहतील, तर विधानसभा निवडणुकीत या वाढीव मतदान केंद्राची भर पडणार आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ३० हजार कर्मचाºयांची गरज भासणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येणार आहे.